कल्याण डोंबिवलीमध्ये आज ८ रुग्णांची नोंद, कोरोनाग्रस्तांची संख्या १३७ वर

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात नवीन ८ कोरोना रुग्णांची भर पडली असून आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या १३७ झाली आहे. कोरोना लागण होणाऱ्या या रुग्णांमध्ये मुंबई येथे काम

 कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात नवीन ८ कोरोना रुग्णांची भर पडली असून आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या १३७ झाली आहे. कोरोना लागण होणाऱ्या या रुग्णांमध्ये मुंबई येथे काम करणाऱ्यांचा आणि कोरोनाबाधित रूग्णांच्या निकटवर्तीयांचा जास्त सहभाग आहे. आज आढळलेल्या नवीन ८ रुग्णांमध्ये डोंबिवली पूर्वेत राहणाऱ्या मुंबई येथील शासकीय परिवहनचा ३८ वर्षीय पुरुष ड्रायव्‍हरचा, कल्याण पश्चिमेतील मुंबई येथील खाजगी बॅंकेचा २१ वर्षीय पुरुष कर्मचारी, कल्याण पूर्वेतील मुंबई येथील खाजगी रुग्‍णालयातील ३४ वर्षीय पुरुष कर्मचारी, डोंबिवली पश्चिमेतील १३ वर्षीय मुलगा आणि ४८ वर्षीय महिला, तर मोहने येथील ७ वर्षीय मुलगी आणि ३२ वर्षीय महिला हे चौघे कोरोना बाधित रुग्णांचे निकट सहवासीत आहेत. तर डोंबिवली पश्चिमेतील खाजगी रुग्णालयातील ४० वर्षीय कर्मचारी यांचा समावेश आहे.आजच्या नवीन ८ रूग्णांमुळे महापालिका क्षेत्रातील एकुण रुग्ण संख्या १३७ झाली असून या रुग्णांपैकी ३ मयत तर ४५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच विविध रुग्णालयांमध्ये ८९ रुग्ण उपचार घेत आहेत. आत्‍तापर्यंत ४९९८  रुग्‍णांना होम क्‍वारंटाईन केलेले असून ९६ रुग्‍ण इस्‍टीटयुशनल क्‍वारंटाईनमध्‍ये आहेत. 

रुग्णांची एकूण संख्या – कल्याण पूर्व -२८, कल्याण पश्चिम -१६, डोंबिवली पूर्व – ४८, डोंबिवली पश्चिम -३५, मांडा टिटवाळा -५, मोहने -५