भटक्या श्वानांची अन्नाची सोय होण्यासाठी त्यांची माहिती महापालिकेच्या आरोग्य खात्याला कळवण्याचे आवाहन

कल्याण : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी लागू असल्यामुळे बहुतांश दुकाने, मार्केट, हॉटेल्स बंद असल्यामुळे, सध्याच्या परिस्थितीत‍ रस्त्यावर मोकाट फिरणारे श्वानदेखील उपाशीपोटी फिरत

कल्याण : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी लागू असल्यामुळे बहुतांश दुकाने, मार्केट, हॉटेल्स बंद असल्यामुळे, सध्याच्या परिस्थितीत‍ रस्त्यावर मोकाट फिरणारे श्वानदेखील उपाशीपोटी फिरत असल्याचे आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी त्वरीत महापालिकेच्या आरोग्य खात्यातील श्वान निर्बिजिकरणाचे काम पाहणाऱ्या कमललेश सोनवणे या आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत या भटक्या श्वानांना अन्न पुरवठा करण्याचे निर्देश दिले. महापालिका क्षेत्रात श्वान निर्बिजिकरणाचे काम मे.वेट सोसायटी फॉर ॲनिमल वेलफेअर ॲन्ड रुरल डेव्हलपमेंट या संस्थेमार्फत केले जाते. महापालिका व सदर संस्था यांचेमार्फत संचारबंदीच्या काळात यापुढेही भटक्या श्वानांना अन्न पुरवठा करण्यात येईल. त्यामुळे अशा प्रकारे भटकी कुत्री रस्त्यावर फिरतांना आढळल्यास श्वान प्रेमी व्यक्तींनी पुढाकार घेऊन कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य खात्याशी संपर्क साधल्यास भटक्या श्वानांसाठी अन्न पुरवठा करणे सुलभ होईल, असे सांगण्यात आले आहे.