क.डों.म.पा.चे माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांचे निधन

कल्याण : कल्याण डोंबिवली मनपाचे (KDMC) माजी महापौर (Former Mayor) आणि ज्येष्ठ अभ्यासू नगरसेवक (Corporator) राजेंद्र देवळेकर (Rajendra Deolekar) यांचे निधन (passes away) झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात (private hospital) उपचार सुरू होते. ठाणे जिल्हा (Thane District) पालकमंत्री एकनाथ शिंदे (Guardian Minister Eknath Shinde) यांनी दोनच दिवसांपूर्वी देवळेकर यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती. मात्र देवळेकर यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

त्यांच्या जाण्याने कल्याण डोंबिवलीतील एक अभ्यासू, मनमिळावू आणि सर्वांना बरोबर घेऊन चालणारा ,शहरांच्या समस्याची जाण असलेला व समस्या सोडवण्यासाठी अग्राही भूमिका घेत शहारातील विकास कामाबाबत पुढाकार घेणारा लोकप्रतिनिधी गमावल्याची खंत व्यक्त होत आहे. तर देवळेकर यांच्या निधनाबाबत सर्वपक्षीय राजकारणी, लोकप्रतिनिधीनी सह तळागाळातील वर्गातून हळहळ व्यक्त होत आहे.