कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून वाटलेल्या खिचडीत आढळला किडा, ही बाब स्वीकारण्यास प्रशासनाचा नकार

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात हातावर पोट असणाऱ्या परिवाराला स्वयंसेवी संस्थांकडून तयार जेवण दिले जात असून त्यांचे वितरण प्रशासनाचे अधिकारी करीत असतानाच तीन दिवसापूर्वी मोहने गाळेगाव

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात हातावर पोट असणाऱ्या परिवाराला स्वयंसेवी संस्थांकडून तयार जेवण दिले जात असून त्यांचे वितरण प्रशासनाचे अधिकारी करीत असतानाच तीन दिवसापूर्वी मोहने गाळेगाव विभागातील शास्त्रीनगर जवळील झोपडपट्टीत राहत असणाऱ्या रोहिणी गरुड या महिलेला दिलेल्या जेवण्याच्या खिचडीत किडा आढळल्याने येथे खळबळ माजली आहे.

शहरातील  ‘अ’ प्रभाग क्षेत्र विभागाचे वॉर्ड अधिकारी, कर्मचारी अडीच ते तीन हजार तयार जेवणाचे कीट गरजूंना वाटत आहेत. प्रभाग क्रमांक १२ गाळेगावमध्ये दोन दिवसांपुर्वी खिचडी वाटप करण्यात आले. येथे राहात असणाऱ्या रोहिणी गरुड यांनी खिचडीचे ४ किट घेतले होते. चारही कीटमधील खिचडी तव्यावर गरम करण्यासाठी टाकली असता, त्या खिचडीमध्ये किडा आढळून आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या संदर्भात त्यांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरात राहत असणाऱ्या नागरिकांनी याबाबत तीव्र असंतोष व्यक्त केला आहे..वाटप करत असणाऱ्या खिचडीमध्ये निकृष्ट दर्जाचे पदार्थ वापरले जात असल्याचा आरोप येथील  नागरिकांनी केला आहे. या संदर्भात प्रभाग अधिकारी सुधीर मोकल यांना विचारले असता या भागात जंगल असून खिचडी तव्यावर गरम करीत असताना किडा पडल्याचे सांगून आम्ही दिलेल्या खिचडीत किडा नसल्याचे सांगितले आहे.