कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे हौसिंग सोसायटीमधील सदस्यांची तपासणी करण्याचे आवाहन

कल्याण : सध्‍या जगभरात पसरलेल्‍या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी शासनाने राज्‍यात अनेक प्रतिबंधात्‍मक उपाययोजना केल्‍या आहेत. त्‍याचाच भाग

 कल्याण :  सध्‍या जगभरात पसरलेल्‍या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी शासनाने राज्‍यात अनेक प्रतिबंधात्‍मक उपाययोजना केल्‍या आहेत. त्‍याचाच भाग म्‍हणून कल्‍याण डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोव्हिड-१९ साथरोगाचा प्रादुर्भाव रोखण्‍याकामी सर्व गृहनिर्माण हौसिंग सोसायटी पदाधिकारी यांनी महापालिका प्रशासनास सहकार्य करावे आणि खालीलप्रमाणे उपाययोजना हाती घ्‍याव्‍यात, असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

 
सर्व सोसायट्यांनी पल्स ऑक्सीमीटर व थर्मल स्कॅनिंग गन खरेदी करुन सोसायटी सदस्‍यांची दररोज तपासणी करावी. त्‍यासाठी सोसायटीने स्‍वयंसेवक सदस्‍यांची नियुक्‍ती करुन दररोज तपासणीची यंत्रणा उभी करावी.
 
पल्स ऑक्सीमीटर व थर्मल स्कॅनिंग गनमध्‍ये खालीलप्रमाणे निरिक्षणे नोंदविली गेल्‍यास त्‍वरीत महापालिकेच्‍या आरोग्‍य विभागास कल्‍याण करीता रुक्मिणीबाई दवाखाना ०२५१-२३१०७०० व डोंबिवलीकरीता शास्‍त्रीनगर दवाखाना ०२५१-२४८१०७३ या हेल्‍पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.
 
 १) एसपीओ २      –       ९५% कमी असल्‍यास 
 
 २) पल्स     –    ६० पेक्षा कमी किंवा १०० पेक्षा जास्‍त असल्‍यास 
 
 ३) तापमान    –  ३८ . से. किंवा १००. एफ पेक्षा जास्‍त असल्‍यास 
 
सोसायटी सदस्‍यांमधून उच्‍च रक्‍तदाब, मधुमेह, डायलिसीस, कर्करोग इ. पेशंट असलेल्‍या व्‍यक्‍ती तसेच वयोवृध्‍द नागरिक, दिव्‍यांग व्‍यक्‍ती यांची माहिती तयार ठेवावी व त्‍यांच्या बाबततीत दररोज विचारपूस करुन आजारासंबंधी काही तक्रार असल्‍यास त्‍यांना वैद्यकीय सेवा उपलब्‍ध करुन देणेबाबत मदत करावी. तसेच याबाबत महापालिकेच्‍या आरोग्‍य प्रशासनास कळविण्‍यात यावे. सर्व नागरिक व सोसायटी पदाधिकारी यांनी कल्‍याण डोंबिवली महापालिका क्षेञात कोव्हिड-१९ वर नियंञण आणण्‍यासाठी व त्‍याचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.