एपीएमसीने परवानगी दिलेल्या शेतमालाच्या गाड्यांनाच कल्याण डोंबिवली हद्दीत प्रवेश देणार – आयुक्त

कल्याण : भाजी व फळ फळावळ विक्री करणाऱ्या गाड्या /ट्रक पुणे,जुन्नर, नाशिक, नगर या मार्गाने वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटमध्ये (ए.पी.एम.सी.) जातो, असे सांगून डोंबिवली महापालिका हद्दीत

कल्याण : भाजी व फळ फळावळ विक्री करणाऱ्या गाड्या /ट्रक पुणे,जुन्नर, नाशिक, नगर या मार्गाने वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटमध्ये (ए.पी.एम.सी.) जातो, असे सांगून डोंबिवली महापालिका हद्दीत प्रवेश करतात असे निदर्शनास आले आहे. परंतु या गाड्या वाशी येथे न जाता कल्याण डोंबिवली महापालिकेने भाजी विक्रीसाठी नियोजन केलेल्या फडके मैदान व इतर जागी थांबुन भाजी विक्री करत असल्याचे आढळून आलेले आहे. महापालिकेने परवाना दिलेल्या भाजी विक्रीच्या गाड्यादेखील महापालिका हद्दीत प्रवेश करतात. यामुळे भाजी विक्रीस परवानगी दिलेल्या मैदानांवर मोठया प्रमाणावर भाजी विक्रेत्यांची गर्दी झालेली आढळून येते.त्यामुळे कोरोना साथीच्या पार्श्वभुमीवर गर्दीवर नियंत्रण ठेवणेसाठी आयुक्त, डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार  ए.पी.एम.सी.मार्केट वाशी यांनी ज्या गाड्यांचे क्रमांक अधिकृतरित्या महापालिकेस कळविले असतील त्याच गाड्यांना महापालिका हद्दीतुन वाशी येथे जाण्यास परवानगी दिली जाणार आहे. तसेच महापालिका व एपीएमसी,कल्याण यांनी दिलेल्या परवानगी व्यतिरिक्त इतर गाडयांना महापालिका हद्दीत प्रवेश दिला जाणार नाही आणि त्या भाजी विक्री करतांना आढळल्यास त्यांचेवर कारवाई केली जाईल.