निसर्ग चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका सज्ज

कल्याण : हवामान विभागाने संभाव्य चक्रीवादळाचा इशारा दिला असुन या संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी कल्याण डोंबिवली प्रशासन सज्ज असुन दक्षता म्हणून उपाययोजना केली

 कल्याण :  हवामान विभागाने  संभाव्य चक्रीवादळाचा इशारा दिला असुन या संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी  कल्याण डोंबिवली प्रशासन सज्ज असुन दक्षता म्हणून उपाययोजना केली आहे. मुंबईसह राज्यातील पूर्वानुमान नोंदवल्यानुसार ३ व ४ जून पालघरमध्ये अति मुसळधार तर मुंबई, ठाणे, रायगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

अरबी समुद्रात लक्षद्वीपजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. येत्या २४ तासात हा कमी दबाचा पट्टा अधिक तीव्र होऊन त्यांचे रुपांतर चक्रीवादळामध्ये होण्याची शक्यता आहे. हे वादळ उत्तरेच्या दिशेने मार्गक्रमण करून त्यानंतर  जून रोजी उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्याला धडकू शकते, अशा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. या संभाव्य चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाली आहे.  पालिका प्रशासनाने संभाव्य चक्रीवादळ  व पावसामुळे वीज पुरावठा खंडीत होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून कोवीड केअर हँस्पीटलच्या ठिकाणी बँटरी बँक् अँपची व्यवस्था करण्यात आली असुन सखल भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थालंतर करण्यासाठी शाळा ताब्यात घेत सँनिटायझ करण्यात येत आहेत. कल्याण डोंबिवली अग्निशमन विभाग संभाव्य परिस्थितीत मदतीसाठी सज्ज असुन सहा बोटी देखील सज्ज केल्या आहेत. शहरातील सर्व हाँस्पिटलांना सज्ज राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. आर् टी.ओ. विभागा मार्फत शहारातील रूग्णवाहिकांना या संभाव्य आप्तकालीन परिस्थितीत सज्ज राहण्यास सांगितले असुन झाडांच्या फाद्या अथवा झाड कोसळल्याच्या परिस्थितीत फायर बिग्रेड मार्फत व आप्तकालीन पथक यंत्रणे मार्फत तातडीने दक्षता घेत मार्ग मोकळा करण्यासंबंधी सुचना दिल्या आहेत. तसेच क.डो.म.पा. प्रशासन जिल्हा आप्तकालीन यंत्रेणेशी  समन्वय साधत संभाव्य आप्तकालीन परिस्थितीसाठी सज्ज आहे.  शहारामध्ये रिक्षा फिरवुन संभाव्य चक्रीवादळाची सुचना तसेच नागरिकांनी दक्ष राहण्यासाठी जन जागुती केली आहे. खाडी किनारी, नदी किनारी, सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना दक्षतेचा सुचना केल्या असुन स्थानिक मच्छीमारांना दक्ष राहण्यास सांगितले आहे.   महापालिका प्रशासन संभाव्य चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी सज्ज असुन कच्च्या व धोकादायक घरातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, तसेच या संभाव्य परिस्थितीत नागरिकांन घराबाहेर पडु नये, असे आवाहन आपत्कालीन विभागाचे आतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी केले आहे.