आरोग्य विभागात कोरोनाच्या शिरकावानंतर कल्याण डोंबिवली महापालिकेत खबरदारी – मुख्यालयातील इमारतींचे केले निर्जंतुकीकरण

कल्याण : कोरोनाने केडीएमसीच्या आरोग्य विभागात शिरकाव करत एका कोविड योध्दा डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याने आरोग्य विभागाच्या प्रशासकीय यंत्रणेवरील ताण वाढला असून यानंतर खबरदारी म्हणून महापालिका

 कल्याण : कोरोनाने केडीएमसीच्या आरोग्य विभागात शिरकाव करत एका कोविड योध्दा डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याने आरोग्य विभागाच्या प्रशासकीय यंत्रणेवरील ताण वाढला असून यानंतर खबरदारी म्हणून महापालिका मुख्यालयातील इमारतींचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. यासाठी आज आणि उद्या कार्यालयीन कामकाज बंद ठेवण्यात आले आहे.

कोरोना संसर्गाला आळा बसण्यासाठी आरोग्य विभागासह प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असुन कोरोना रूग्णांची वाढती संख्या प्रशासन  रोखण्यासाठी उपाययोजना करीत असले तरी दिवसेंदिवस कोरोना रूग्ण संख्या वाढत आहे. अशातच कोरोनाने आरोग्य विभागात शिरकाव केल्याने उपाययोजना म्हणुन कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासकीय इमारत, अल्प बचत भवन, सचिव कार्यालय इमारत साँनिटायझ करण्यासाठी २८ मे पर्यंत कार्यालयीन कामकाज बंद ठेवण्याचे, वॉर रूम सुरु ठेवण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी काढले आहेत.  तसेच आरोग्य विभागात सद्यस्थितीत कार्यरत असलेले कार्मचारी आधिकारी यांची कोरोना स्वॅब चाचणी करण्यात येणार असल्याचे मुख्य आरोग्य अधिकारी यांनी सांगितले.  तसेच कोरोना साखळी तोडण्यासाठी किती जण त्यांच्या संपर्कात होते. हे शोधुन होम क्वारंटाईन,  रॅपिड स्वॅब चाचण्या करण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. आरोग्य विभागात कोरोनाने शिरकाव केल्याने प्रशासकीय यंत्रणेने आता आरोग्य विभागातील कर्मचारी यांना विशेष काळजी घेत सर्व सुरक्षा बाबींसह दक्षता घेऊन कोवीड योद्ध्यांची काळजी घेणे गरजेचे आहे.