कल्याण डोंबिवलीत सम विषम पद्धतीने दुकाने सुरु राहणार

कल्याण : सध्‍या जगभरात पसरलेल्‍या कोरोना विषाणूची लागण कल्‍याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातही झाली आहे. या रोगाचा प्रसार टाळण्‍यासाठी शासनाने राज्‍यभर अनेक प्रतिबंधात्‍मक

कल्याण : सध्‍या जगभरात पसरलेल्‍या कोरोना विषाणूची लागण कल्‍याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातही झाली आहे. या रोगाचा प्रसार टाळण्‍यासाठी शासनाने राज्‍यभर अनेक प्रतिबंधात्‍मक उपाययोजना लागू केल्‍या आहेत. शासनाच्‍या आदेशानुसार लॉकडाऊन शिथील करण्‍याच्‍या अनुषंगाने कल्‍याण डोंबिवली महानगरपालिकेने रस्‍त्‍याच्‍या/गल्‍ली/पॅसेजच्‍या एका बाजूची सर्व दुकाने एका दिवसासाठी पुर्ण कामकाजाच्‍या वेळेत  म्हणजेट सकाळी ९.०० ते सायंकाळी५.०० या वेळेत सुरु राहतील व रस्‍त्‍याच्‍या दुसऱ्या बाजूची दुकाने दुसऱ्या दिवशी सुरू राहतील व यापुढेही आळीपाळीने ही दुकाने सुरु राहतील, असे आदेश आयुक्तांनी दिले आहे. यामध्‍ये मेडिकल स्टोअर्स, रुग्‍णालय/क्लिनिक व फक्‍त दुध व दुग्‍धजन्‍य वस्‍तू विक्रीची दुकाने (डेअरी) या दुकानांना सुट देण्‍यात आली आहे. त्‍याचप्रमाणे या आदेशातून बेकरी व किराणा दुकाने या दुकानांना देखील सूट देण्‍यात येत असून, ही दुकानेदेखील दररोज पुर्ण कामकाजाच्या वेळेत सकाळी ९.००ते सायंकाळी ५.०० सुरू राहतील, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.