karjat dumping ground visit

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने(kalyan dombivali municipal corporation) शुन्य कचरा मोहीम सुरु करुन शहर स्वच्छतेचा वसा घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर घनकचरा व्यवस्थापनाचे उप आयुक्त रामदास कोकरे यांनी शनिवारी रविवारी कर्जत येथे त्यांनी राबिवलेल्या ४ एकर डम्पिंग ग्राऊंडवरील फुलबाग, भाजीपाला मळा, फळबागेचा दोन दिवसीय पाहणी(karjat dumping ground garden visit), प्रशिक्षण दौरा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्या समवेत केला.

या दौऱ्यानिमित्ताने कल्याण आधारवाडी डम्पिंगवर कर्जत येथील डम्पिंग ग्राऊंडवर असणाऱ्या उद्यानाप्रमाणे उद्यान फुलविण्याचा प्रशासनाचा मानस असुन काही दिवसात आधारवाडी डम्पिंगचे सपाटीकरण काम पुर्ण झाल्यानंतर फुल उद्यान , फळबाग, भाजीपाला मळा साकारण्याबाबत प्रस्ताव तयार केला असल्याचे घनकचरा व्यवस्थापनचे उप आयुक्त रामदास कोकरे यांनी सांगितले.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दरम्यान प्रशासनाने कचराकुंडी मुक्त शहर मोहिम सुरू केली. त्यामध्ये व्यापक जनजागृती माध्यमातून ओलाकचरा सुका कचरा वर्गीकरण बंधनकारक करीत शुन्य कचरा मोहीम व्यापक केली. ओला व सुका कचरासाठी वेगवेगळ्या घंटागाडी मार्फत गोळा केला जात आहे. ओला कचरा डम्पिंगवर विल्हेवाटीसाठी नेला जातो. तर सुका कचऱ्याच्या भंगार माध्यमातून भंगारवाल्यांना प्लॅस्टिक, काचा भंगार विक्रीतून मनपा उत्पन्न स्त्रोत तयार झाला आहे.

शहरामध्ये इतस्ततः कचरा टाकणार्या वर क्लीन मार्शलची नेमणूक करण्यात आली असुन यामध्ये कचरा टाकणाऱ्याकडून २००रू दंड ते ५ हजार रू दंड वसुल केला जात आहे. तसेच प्लॅस्टिक पिशव्या बंदीमुळे कापडी पिशव्यांना प्राधान्य मिळणार आहे. मनपाक्षेत्रातील महिला बचत गटांनी पुढे आल्यास कापडी पिशव्या बनविण्याच्या माध्यमातून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. कोवीड पार्श्वभूमीवर मनपाक्षेत्रात सॅनिटायझर, धुरवणी, फावरणी मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच गणपती उत्सवानिमित्त निर्माल्य कलशातुन संकलित केलेल्या निर्मल्यातुन डम्पिंग करीत मनपाने खत निर्मितीकडे भर दिला आहे.

मनपाच्या पुढाकाराने ६ सोसायटींनी पुढाकार घेत ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प सुरू केले आहेत. अशा सोसायटींना ५ टक्के कर सवलत योजना सुरु करण्यात आली आहे. नव्याने इमारत परवानगी घेताना खतनिर्मिती प्रकल्प राबिविणे निकडीचे केले आहे. पालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत शुन्य कचरा मोहिम, उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याची माहिती उपआयुक्त रामदास कोकरे यांनी दिली.