कल्याण- डोंबिवलीमध्ये आज फक्त एका कोरोना रुग्णाची नोंद

कल्याण : आज कल्‍याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात केवळ १ कोरोनाबाधित रुग्‍ण आढळून आला. तसेच ४ कोरोनाबाधित रुग्ण उपचाराअंती डिस्चार्ज होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील

 कल्याण : आज कल्‍याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात केवळ १ कोरोनाबाधित रुग्‍ण आढळून आला. तसेच ४ कोरोनाबाधित रुग्ण उपचाराअंती डिस्चार्ज होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील कोरोना बाधित व उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता ३५ इतकी आहे. तर निळजे आरोग्य केंद्रातील रुग्णासह एकूण आतापर्यंतच्या कोरोना रुग्णांची संख्या ६१ झाली आहे. आज नव्याने आढळून आलेला रुग्ण हा डोंबिवली पूर्वेतील २६ वर्षीय तरुण आहे. तर ४ रुग्णांना पूर्ण उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

महापालिकेने शास्त्रीनगर रुग्णालय हे  कोव्हिड -१९ साठी असल्याचे यापूर्वीच जाहिर केले आहे. त्याचप्रमाणे प्रभाग क्षेत्र कार्यालयात ठिकठिकाणी तापाचे दवाखाने देखील नागरीकांच्या सोयीकरीता उघडण्यात आलेले आहेत. महापालिकेने कोव्हीड-१९ रुग्णांसाठी अत्याधुनिक सेवांनी युक्त  कोव्हिड हॉस्पिटल म्हणूननिऑन हॉस्पिटल जाहिर केले असून तेथे ११ कोरोना बाधीत रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत महापालिकेने घेतलेल्या एकूण स्वॅब पैकी आज रोजी ६३ स्वॅबचे रिपोर्ट निगेटीव्ह आलेले आहेत. आज एकुण ३१ स्वॅब घेण्यात आलेले असून ते पुढील तपासणीसाठी सर जे.जे.रुग्णालय, मुंबई येथे पाठविण्यात आलेले आहेत.