काही महिलांना पुण्याला नेण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या गाडीचा वापर

कल्याण : कल्याण डोंबिवली आरोग्य विभागाच्या औषधे ने आण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गाडीचा चालकाने महिलांना दौंड येथे सोडण्यासाठी वापर करण्याचा प्रयत्न लोणावळा पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान तापसणी

 कल्याण : कल्याण डोंबिवली आरोग्य विभागाच्या औषधे ने आण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गाडीचा चालकाने महिलांना दौंड येथे सोडण्यासाठी वापर करण्याचा प्रयत्न लोणावळा पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान तापसणी अंती उजेडात आल्याने सरकारी वाहनाचा दुरुपयोग केल्याचे उजेडात आले आहे.                        केडीएमसीच्या वाहन चालकाने चक्क आरोग्य विभागाच्या औषधे ने -आण करण्यासाठी वापरत असलेल्या व्हॅनचा गैरवापर करीत गुरुवारी बुध्द पौर्णिमाच्या सुट्टीच्या दिवशी काही महिलांना घेऊन दौंड येथे सोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चालक या महिलांना त्यांच्या गावी सोडणार होता. मात्र, लोणावळ्यात पोलिसांना गाडी अडवल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.

आता या प्रकारचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने संबंधित चालकावर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार बाबासाहेब भंडारे हा कल्याण येथील रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत चालक भंडारे हा चार महिलांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी केडीएमसीचे व्हॅक्सिन व्हॅन (एमएच ०५-आर- ०९२७) घेऊन निघाला होता. याबाबत चालक भंडारे त्याने केडीएमसीची कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. अत्यावश्यक सेवेतील औषध आणण्याकरीता वापरण्यात येणारी व्हॅन दौंड येथे त्यांच्या गावी जाताना लोणावळा चेक पोस्टवर अडवण्यात आली. पोलिसांनी चौकशी सुरू केली असता चालक भंडारे  यांच्याकडे कोणतीही ऑर्डर (परवानगी) नसल्यामुळे त्यांना योग्य उत्तर देता आले नाही. पोलिसांना वाहनावर कायदेशीर कारवाई केली आहे. त्याचबरोबर याबाबत महापालिकेने चालक बाबासाहेब भंडारे याला मनपा आरोग्य अधिकारी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.