‘त्या’ १८ गावांची जबाबदारी कल्याण डोंबिवली महापालिकेकडे असल्याने कोरोनाला रोखणे झाले शक्य

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेतील २७ गावांपैकी १८ गावे वगळून नगरपरिषद स्थापन करण्याचा निर्णय झाला आणि राज्यात व देशात कोरोना रोगाचा शिरकाव झाला. यामुळे १८ गावांची नगरपरिषद स्थापन करणारा

 डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेतील २७ गावांपैकी १८ गावे वगळून नगरपरिषद स्थापन करण्याचा निर्णय झाला आणि राज्यात व देशात कोरोना रोगाचा शिरकाव झाला. यामुळे १८ गावांची नगरपरिषद स्थापन करणारा अध्यादेश निघू शकला नाही. यामुळे ही सर्व २७ गावे कल्याण डोंबिवली महापालिकेत आहेत व या गावात उत्तम सफाई, फवारणी करण्यात येत असल्यामुळे आरोग्य विभाग या गावात कोरोना आजाराचा शिरकाव रोखण्यात यशस्वी झाली. ही गावे वेगळी केली असती तर या गावांना वाली कोण राहिला असता असा प्रश्न गावकरी करू लागले आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिका विभागात आतापर्यंत ६० जण कोरोनामुळे बाधित झाले त्यांतील २० जण बरे होऊन घरी पण गेले व इतरांवर उपचार सुरू आहेत २७ गावात एकही रुग्ण नाही याचे कारण आरोग्य कर्मचार्याला विचारले असता त्यांनी सांगितले की, २७ गावात सफाई मोठ्या प्रमाणात नियमित होत असून जंतुनाशक फवारणी पण होत आहे. त्यातच ग्रामस्थानी गाव बंदी केल्यामुळे गावातील नागरिक बाहेर जाऊ शकत नाही व बाहेरचा आत येऊ शकत नाही ही स्थिती केवळ २७ गावात नाही तर कल्याण ग्रामीण तालुक्यात असून यामुळे कोरोना लांब राहिला आहे.
 
या संदर्भात शिवसेना कल्याण ग्रामीण तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे याना विचारले असता त्यांनीही याला दुजोरा दिला मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी १८ गावे वगळून नगरपरिषद स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आठ दिवसातच कोरोना रोगाविरुद्ध मोहीम सुरू झाली आणि नगरपरिषद स्थापन करण्याचा अध्यादेश निघू शकला नाही. यामुळे या १८ गावांची जबाबदारी पण महापालिकेवर आली व ती त्यांनी अतिशय योग्य रीतीने पार पडली कचरा सफाई, जंतूनाशक फवारणी यामुळे २७ गावात आजाराचा शिरकाव होऊ शकला नाही जर ही गावे वगळून नगरपरिषद जाहीर झाली असती तर कोण सर्व करणार होते असा सवाल त्यांनी केला ती १८ गावे महापालिकेत असल्यामुळे आजारापासून दूर राहिली, असेही त्यांनी स्पष्ट केले.