कल्याण डोंबिवली महानगरपालिका राबविणार शून्य कचरा मोहीम

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कल्‍याण(प) येथील नागरिकांची आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडमुळे होणाऱ्या त्रासातून सुटका होण्‍याच्‍या दृष्‍टीने महापालिकेमार्फत

 कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील  कल्‍याण(प) येथील नागरिकांची आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडमुळे होणाऱ्या त्रासातून सुटका होण्‍याच्‍या दृष्‍टीने महापालिकेमार्फत शुन्‍य कचरा मोहिम २५ मे, २०२० पासून संपूर्ण महापालिका क्षेत्रात राबविण्‍यात येणार आहे. तसेच २५ मे पासून महानगरपालिका एकत्रित मिश्र कचरा (ओला व सुका एकत्रित कचरा) उचलणार नाही.

घनकचरा व्‍यवस्‍थापन नियम २०१६ व मा.राष्‍ट्रीय हरित लवाद दावा क्रमांक १९९/२०१४ मधिल आदेशानुसार तसेच महाराष्‍ट्र शासनाच्‍या मार्गदर्शक सूचना व उपविधीनुसार ओला कचरा, सुका कचरा व घरगुती घातक कचरा या प्रमुख प्रकारामध्‍ये कच-याचे वर्गीकरण करणे सर्वांना बंधनकारक आहे.  ओला कचरा या प्रकारात फळे, भाज्‍या यांचे टाकाऊ भाग, शिल्‍लक राहिलेले अन्‍न इत्‍यादींचा समावेश होतो. हा कचरा स्‍वतंत्र डस्‍टबीनमध्‍ये ठेवून तो देण्‍यात यावा अथवा सोसायटीमध्‍ये स्‍वतंत्र स्विकारण्‍याची व्‍यवस्‍था असलेल्‍या डस्‍टबिनमध्‍ये टाकावा. ओला कचरा कोणत्‍याही परिस्थितीत प्‍लास्टिक पिशव्‍यांमध्‍ये बांधला जाणार नाही अथवा त्‍यामध्‍ये प्‍लॉस्टिक, कागद व अन्‍य कचऱ्याचे घटक राहणार नाही याची दक्षता घेण्‍यात यावी, ओला कचरा दररोज उचलण्‍यात येईल.