केडीएमटी चालकाचा कोरोनामुळे मृत्यू

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतील चालक असलेल्या कोरोना योध्द्यांचा कोरोना झाल्याने उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. के.डी.एम्. टी. प्रशासनातील

 कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतील चालक असलेल्या कोरोना योध्द्यांचा कोरोना झाल्याने उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. के.डी.एम्. टी. प्रशासनातील एक चालक कोरोनाचा पहिला बळी ठरला आहे.                                   

कल्याण पश्चिमेत राहणाऱ्या के.डी.एम.टी बस चालक राजेंद्र तळाले हे लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा अंतर्गत बस चालक म्हणुन कार्यरत होते. २१ जून रोजी कोरोना झाल्याचा रिपोर्ट आल्यामुळे त्यांना मनपाच्या शास्त्री नगर रूग्णालयात दाखल केले. परंतु तिथून त्यांना खाजगी निऑन हॉस्पिटलमध्ये हालविण्यात आले. तिथे त्यांच्या कुटुंबियांनी पन्नास हजार रूपये डिपॉझिट भरल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु झाले. मात्र गुरुवारी पहाटे कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या या कोरोना लढवय्याचा दुर्दैवी मुत्यु झाल्याने एकच हळहळ व्यक्त होत आहे.    
 
 चालक असलेल्या कोरोना योद्ध्याच्या कुटुंबाचा कोरोना ससेमिरा सुटला नसुन त्यांचा मुलगा, पत्नी यांचा  कोरोना रिपोर्ट गुरुवारी पॉझिटीव्ह आल्याने कुटुंब पुरते दुखःद प्रसंगात हवालदिल झाले असुन कुटुंबाची प्रशासनाने दखल न घेता फोन करून सांत्वन करण्याचे देखील सौजन्य दाखविले नसल्याचे समजते.  
 
याबाबत परिवहन मुख्य व्यवस्थापक मारुती खोडके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,  चालक राजेंद्र यांचा कोरोनाने उपचारादरम्यान मृत्यू
झाला असुन त्यांना पंतप्रधान योजने अंतर्गत मदत मिळण्याबाबत प्रयत्न करणार असुन मुंबई मनपा धर्तीवर ५०लाखांची मदत केली जाईल का असे विचारले असता नकारात्मक उत्तर दिले. तसेच पत्नी व  मुलगा कोरोना पॉझिटीव्ह आल्याने त्यांच्या उपचाराबाबत आपला विभाग काय मदत करणार असे विचारले असता आपण हतबल असल्याचे सागंत हात झटकले. तसेच अनुकंपा तत्वावर कुटुंबातील एकाला नोकरीबाबत प्रशासन लक्ष देणार असल्याचे सांगितले.  
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजेंद्र यांना मधुमेहाचा त्रास होता. शासन धोरणानुसार उच्च रक्तदाब, मधुमेह ग्रस्त आशांना अत्यावश्यक सेवेत शिथिलता द्यावी असे असताना देखील त्यांना कामावर येण्याची सक्ती का गेली हे सवाल यानिमित्ताने उभे ठाकले आहेत. तर अंतिम संस्कारासाठी अॅम्ब्युलन्स ३ हजार  मागणी केल्याने वाद झाल्याचे समजते. तर आता प्रशासनाने कोवीड योध्दाच्या कोरोनाची लागण झालेल्या पत्नी व मुलास रूग्णालयात दाखल करून तातडीने लक्ष दिले पाहिजे व कुटुंबाला आर्थिक मदत करणे गरजेचे असल्याचे यानिमित्ताने चित्र दिसत आहे.