केडीएमटी परिवहन वाहकाचा कोरोनाने मृत्यू

परिवहन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन विभागातील बस चालकाचा कोरोनाने दोनच दिवसापुर्वी मुत्यु झाल्याने परिवहन सेवेतील पहिला कोरोनाचा

परिवहन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर 

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन विभागातील बस चालकाचा कोरोनाने दोनच दिवसापुर्वी मुत्यु झाल्याने परिवहन सेवेतील पहिला कोरोनाचा पहिला बळी गेला होता. हि घटना ताजी असतांनाच  रविवारी पहाटे कोरोना मुळे एका वाहकाचा मुत्यु झाल्याची घटना घडल्याने परिवहन सेवेतील कोरोनाचा दुसरा बळी गेल्याने परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले असून परिवहन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.       

केडीएमटी मधील कर्तव्यनिष्ठ  वाहक हुसेन बादशहा कोरोना योद्धा यांचे आज सकाळी कोरोना आजाराशी लढा  देताना ठाणे सिव्हिल रूग्णालयात दु:खद निधन झाले. आँनड्युटी असताना ताप आला म्हणुन रूक्मिणी बाई दवाखान्यात गेले असता त्यांना ताप असल्यामुळे कोरोना टेस्ट केली. त्याचा रिपोर्ट पाँजिटिव्ह आला होता. अंबरनाथ येथे राहणारे हुसेन बादशाह यांचा रिपोर्ट पाँझाँटिव्ह आल्याने उपचारार्थ ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल केले होते. कोरोना आजाराशी लढा देताना रविवारी पहाटे या लढ्ढवयाचा दुर्दैवी मुत्यु झाला.

दरम्यान परिवहन मधील दोन कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने इतर परिवहन कर्मचारी भयभीत झाले आहेत. महानगरपालिका प्रशासन आपल्याच कर्मचाऱ्यांवर देखील उपचार करण्यासाठी कमी पडत असल्याने त्यांना इतर रुग्णालयात हलवावे लागत असून त्याचा खर्च देखील या कर्मचाऱ्यांनाच करावा लागत असल्याने अत्यावश्यक सेवेत काम करणारे हे कर्मचारी धास्तावले आहेत.