खडवलीत शिवसेना व युवासेनेच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न

कल्याण : खडवलीत शिवसेना व युवासेना, तसेच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा- ठाणे या रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमाने कोरोना संकट परिस्थितीत राज्य सरकारने केलेल्या आवाहनाला

कल्याण : खडवलीत शिवसेना व युवासेना, तसेच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा- ठाणे या रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या  संयुक्त विद्यमाने कोरोना संकट परिस्थितीत राज्य सरकारने  केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सोशल डिस्टन्सिंग व योग्य ती काळजी घेत रक्तदान शिबीर शुक्रवारी संपन्न झाले.       कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार कोरोनाग्रस्तांना रक्ताची कमतरता भासू नये, त्यांना तात्काळ रक्तपुरवठा व्हावा, या उद्देशाने युवासेना व शिवसेना कल्याण ग्रामीण विभागाच्या वतीने कोविड- १९ च्या धर्तीवर व महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्र, खडवली येथे कल्याण ग्रामीण शिवसेना तालुकाप्रमुख वसंत लोणे व ठाणे जिल्हा युवासेना सचिव अल्पेश भोईर यांच्या नेतृत्वाखाली व अनेक युवा कार्यकर्त्यांच्या योगदानाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात  १०१ रक्तदात्यांनी  रक्तदान केले. या रक्ततदान शिबिराला तरूणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

 प्रत्येक रक्तदात्याला प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले .  सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत संपन्न झालेल्या या रक्तदान शिबिराला हातमाग यंत्र महामंडळाचे अध्यक्ष व शिवसेना ठाणे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी भेट देऊन आयोजकांना शुभेच्छा दिल्या व रक्तदात्यांचा सन्मान केला. यावेळी या शिबिराला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा दीपाली पाटील, जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या सभापती वैशाली चंदे यांनी भेट देत आयोजकांना व सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. रक्तदान शिबीराप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या सुषमा लोणे, कल्याण पंचायत समितीचे सदस्य रमेश बांगर, कल्याण उपतालुकाप्रमुख  जाधव, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भूषण जाधव, कल्याण सहकारी सेना तालुका प्रमुख  अनिल चौधरी, शिवसेना तालुका सचिव  बुटेरे, युवासेना उपतालुकाधिकारी किरण मोरे, उपविधानसभा अधिकारी मुरबाड सतीश चौधरी, खडवली शिवसेना विभागप्रमुख भाऊ दलाल, शाखाप्रमुख नितीन विशे, युवासेना दानबावचे शाखाधिकारी मधुकर चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा- ठाणे या रुग्णालयाच्या रक्तपेढीने उत्कृष्ट व्यवस्थापन करून शिबीर संपन्न केले. डॉ. शिवकुमार कोरी, डॉ. स्वाती गांगुर्डे तसेच मिलिंद कासारे, प्रमोद वानखडे, प्रशांत शिंगाणे, सुरज पाटील, नीलम साळवी, सुचिता आंबरे, सिद्राम जाधव या रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यानी अथक परिश्रम घेतले. यावेळी सुरक्षित अंतर राखून मास्क वाटप, सॅनिटायझरचा वापर, थर्मलद्वारे  तपासणी आदी विशेष उपक्रम राबविण्यात आले.