दारू पिण्यास नकार देणाऱ्या मित्रावर चाकूने हल्ला

भिवंडी: मित्राने दारू पिण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून त्यास शिवीगाळ करत त्याच्यावर चाकूने सपासप वार केल्याची घटना गायत्रीनगर परिसरात शुक्रवारी रात्री घडली आहे. या चाकू हल्ल्याप्रकरणी

भिवंडी: मित्राने दारू पिण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून त्यास शिवीगाळ करत त्याच्यावर चाकूने सपासप वार केल्याची घटना गायत्रीनगर परिसरात शुक्रवारी रात्री घडली आहे. या चाकू हल्ल्याप्रकरणी मित्राच्याविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदिल बादशाह असे गुन्हा दाखल झालेल्या मित्राचे नाव आहे. त्याने मित्र इम्रान अब्दुल समद शेख यास २६ जून रोजी दारू पिण्यासाठी सोबत येण्यास सांगितले. त्यावेळी त्याने नकार दिला असता आदिलने त्याचा राग मनात धरून इम्रान हा शुक्रवारी त्याचा मित्र शोएब याच्यासोबत दुकानात पाव आणण्यासाठी जात असताना त्यास रस्त्यात अडवून शिवीगाळ करत त्याच्या डाव्या खांद्याच्या पाठीमागील बाजूस चाकूने सपासप चार ते पाच वेळा वार करून गंभीर जखमी केले आहे.या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या इम्रान शेख यास उपचारासाठी ऑरेंज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पाखरे करीत आहेत.