गुरे चरायला घेऊन गेल्याच्या कारणावरून गुराख्याला मारहाण

मुरबाड: वनखात्याने दिलेल्या वनपट्ट्यात गुरे चारल्याचा राग मनात धरून दोघांनी गुराख्यास मारहाण केल्याची घटना दुधनोलीच्या सिद्धेश्वर वाडीत घडली आहे.टोकावडे पोलीस ठाण्यात याबाबत परस्परविरोधी

 मुरबाड: वनखात्याने दिलेल्या वनपट्ट्यात गुरे चारल्याचा राग मनात धरून दोघांनी गुराख्यास मारहाण केल्याची घटना दुधनोलीच्या सिद्धेश्वर वाडीत घडली आहे.टोकावडे पोलीस ठाण्यात याबाबत परस्परविरोधी तक्रारी करण्यात आल्या आहेत. दुधनोली नजीकच्या सिद्धेश्वर वाडीतील सीताराम फळके हे तेथीलच जंगलात गुरे चारण्यास गेले असता गुरे आपल्या जमिनीत चरत असल्याचा राग येऊन येथील किशोर कुडेकर व भाऊ कुडेकर यांनी सीतारामला ठोशे, बुक्के, दगडांनी मारहाण केली.यात सीताराम याला गंभीर दुखापत झाली आहे.