टेम्पो चालकास बेदम मारहाण ; कार चालकावर गुन्हा

भिवंडी: क्षुल्लक कारणावरून कार चालकाने टेम्पो चालकास शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची घटना शहरातील इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स येथे घडली आहे.या मारहाणीप्रकरणी कारचालकाविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात

 भिवंडी: क्षुल्लक कारणावरून कार चालकाने टेम्पो चालकास शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची घटना शहरातील इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स येथे घडली आहे.या मारहाणीप्रकरणी कारचालकाविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.टेम्पो चालक शकील शफीक शहा  हा त्याचा टेम्पो मागेपुढे घेत  असताना टेम्पोच्या समोरून इर्टिका कार चालक कार घेऊन जात होता.त्यावेळी शकीलने टेम्पो थांबवला नाही यावरून संतप्त झालेल्या कार चालकाने कार थांबवून खाली उतरून तुला टेम्पो चालवता येत नाही का ? असे बोलून शकीलला शिवीगाळ करुन हाताच्या ठोश्या बुक्यांनी मारहाण केली व कारमध्ये ठेवलेल्या बॅटने शकीलच्या उजव्या हातावर,शरीरावर ठिकठिकाणी व डोक्यावर मारून त्यास गंभीर जखमी केले आहे.या मारहाणी प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या घटनेचा अधिक तपास कोनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक विजय भालेराव करीत आहेत.