pratap sarnaik and kirit somayya

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि ठाण्यातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यातील वाद शमण्याचे कोणतेच चिन्ह दिसून येत नाहीत. गेले अनेक दिवस या दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्याने ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.

ठाणे : करोडोचा भ्रष्टाचार करून सामान्य जनतेची फसवणूक करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे तीन वर्ष कारागृहात जाऊन आले आहेत. आता मात्र शिवसेनचे आमदार प्रताप सरनाईक याची वेळ आली आहे. सरनाईक किती वर्षे कारागृहात जाणार ? हा येणारा काळच सांगेल असे खळबळजनक विधान भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी रविवारी ठाण्यात केले. ठाण्यातील कोविड हॉस्पिटलच्या पाहणी दौऱ्यावर सोमय्या आले होते त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा सरनाईक याच्या घोटाळ्याप्रकरणी विधान केले.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि ठाण्यातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यातील वाद शमण्याचे कोणतेच चिन्ह दिसून येत नाहीत. गेले अनेक दिवस या दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्याने ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.

ठाण्यातील रेमंड्स कंपनीसमोर १३ मजल्याची विहंग गार्डन हे या दोघांमधील वादाचे मूळ कारण असून ही इमारत प्रताप सरनाईक यांनी अनधिकृतरित्या बांधल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

सदर इमारतीला अनधिकृत ठरवत ठाणे महापालिकेने वापर परवाना पत्र दिले नसताना ही सरनाईक यांनी सदनिका विकून ठाणेकरांची फसवणूक केल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तक्रार सोमय्या यांनी होती.  या प्रकरणा संदर्भात काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी वर्तकनगर पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी जेलची हवा खाऊन आले आता सरनाईक याची वेळ असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.