kirit somayya

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक(mla pratap sarnaik) आणि भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या(mp kirit somayya) यांच्यातील वाद प्रतिवाद अजून सुरुच आहे. आता दोघांनीही एकमेकांविरोधात पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत.

ठाणे: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक(mla pratap sarnaik) आणि भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या(mp kirit somayya) यांच्यातील वाद प्रतिवाद अजून सुरुच आहे. आता दोघांनीही एकमेकांविरोधात पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत. व्होल्टास कंपनी कोविड सेंटरवरील आरोपांना उत्तर देताना सोमय्या व भाजप गटनेते संजय वाघुले यांची पोलीस चौकशी करण्याची मागणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गुरुवारी सरनाईक यांनी केली असताना सोमय्या यांनीही शुक्रवारी ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात सरनाईक यांच्याविरोधात तकार दाखल केली आहे.
दरम्यान १०० कोटींचा दाव्याची खिल्ली उडवताना सोमय्या यांनी, ‘चोर मचाये शोर’असे म्हटले आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी शिवसेनेचे ठाण्यातील ओवळा-माजिवड्याचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला.आमदार प्रताप सरनाईक यांची ठाण्यातील विहंग गार्डनमधील दोन १३ मजली इमारती अनधिकृत असून त्यांनी रहिवाश्यांची फसवणूक केली आहे.तेव्हा,सरनाईक यांच्यावर कारवाई करण्यात यावी.असा तक्रार अर्ज किरीट सोमय्या यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल केला.

तब्बल १३ वर्षे विहंग गार्डन इमारतीना ओसीच (वापर परवाना) नाही. ही कारवाई सेनेचीच सत्ता असलेल्या ठाणे महापालिकेने केली आहे. तेव्हा कलम ४२० अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे. दरम्यान, प्रताप सरनाईक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी अब्रु नुकसानीचा दावा ठोकुन दाखवावा.असे प्रतिआव्हान देखील सोमय्या यांनी दिले आहे.

प्रताप सरनाईक यांनी सामान्य जनतेची लूट केली असून मोठा भ्रष्टाचार त्यांनी केला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. या उलट सरनाईकांचा दावा म्हणजे ‘चोर मचाये शोर’ असल्याचेही सोमय्या म्हणाले.