bhivandi crime

भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर(bhivandi thane bypass road) वाहन चालकांना लुटण्याच्या घटना(theft on bhivandi thane road) वारंवार घडत होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास टेम्पो चालकास लुटून ट्रिपल सीट दुचाकीवरून कल्याणच्या दिशेने पळून जाणाऱ्या त्रिकुटास कोनगाव पोलिसांनी शिताफीने पकडले.

भिवंडी : भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर(Bhivandi thane bypass road) वाहन चालकांना लुटण्याच्या घटना(theft on Bhivandi thane road) वारंवार घडत होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास टेम्पो चालकास लुटून ट्रिपल सीट दुचाकीवरून कल्याणच्या दिशेने पळून जाणाऱ्या त्रिकुटास कोनगाव पोलिसांनी शिताफीने पकडले. त्यांच्या जवळून संपूर्ण मुद्देमालासह दुचाकी जप्त केली आहे .

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रफिक खान हा टेम्पो चालक यवई नाका येथील सिंग ट्रान्सपोर्टसमोर आपला टेम्पो उभी करून झोपला असता त्या ठिकाणी दुचाकी वरून आलेले आकाश कंडारे , फारमान शेख, वसंत  मिश्रा या आरोपींनी फिर्यादिस धमकावून टेम्पोचा दरवाजा उघडण्यास सांगितले. टेम्पो चालकाने भीतीने टेम्पो राजनोली नाक्याच्या दिशेने भरधाव वेगाने पळविला असता या त्रिकूटने त्यास रस्त्यात गाठून टेम्पो समोर दुचाकी आडवी उभी केली. चालकास टेम्पो बाहेर खेचत मारहाण केली. त्याच्याकडील मोबाईल, रोख रक्कम असा ११ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरून त्याच्या टेम्पोचे नुकसान केले. त्यानंतर पळून जात असतानाच या घटनेची खबर कोनगाव पोलीस ठाण्यास मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील व त्यांच्या पथकातील पीएसआय डी पी नागरे,पोलीस कर्मचारी शिंदे, मोरे, पवार,दहीफळे, ढवळे या पथकाने कल्याणच्या दिशेने आपल्या दुचाकीवरून पळून जात असलेल्या तिघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्या जवळून दोन चॉपर, एक फायटर ,मारदांडा असे घटक शस्त्र जप्त करीत चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे.

या कामगिरीबद्दल पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोल यांनी पोलीस पथकाचे अभिनंदन केले असून पोलिसांच्या सतर्कतेमुळे व गस्त प्रमाण वाढविल्याने अनेक गुन्हेगार अटक करण्यात पोलिसांना यश येत असल्याचे पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.