koper bridge

कोपर पुलाचे(Kopar Bridge) काम ८५ टक्के पूर्ण झाले असून फक्त १५ टक्के काम बाकी आहे. पावसाने उघडीप दिली तर बाकी राहिलेले डांबरीकरण आणि रंगरंगोटीचे काम लवकरात लवकर मार्गी लावून पूल गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच खुला करण्याचा पालिकेचा प्रयत्न राहील, असा दावा कल्याण डोंबिवली पालिकेच्या(KDMC) शहर अभियंता सपना देवनपल्ली- कोळी यांनी केला आहे .

    डोंबिवली : डोंबिवली(Dombivali) कोपर उड्डाणपूल(Kopar Flyover) कमकुवत झाल्याने सप्टेंबर २०१९ मध्ये तातडीने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. हा पूल पाडून तेथे नवीन पूल(Kopar Bridge) बांधण्याचे काम सुरू आहे. जूनमध्ये पूल बांधणीचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले होते; परंतु अद्याप या पुलाचे काम मार्गी लागलेले नाही. त्यामुळे गेले दोन वर्षांपासून ठाकुर्ली पुलावरून वाहनांना पूर्व-पश्चिम ये-जा करावी लागत आहे.

    पावसामुळे ठाकुर्ली पश्चिमेकडील भागातील पुलाच्या ठिकाणी खड्डे पडल्याने येथील वाहतूक काही दिवसांपासून मंदावली आहे . वाहनचालकांना कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. ठाकुर्ली पुलावर वाहनांचा वाढलेला ताण पाहता कोपर उड्डाणपूल कधी सुरू होईल ? असा सवाल सर्व जण करत आहेत; परंतु पूल सुरू होण्याची प्रतीक्षा आता लवकरच संपुष्टात येणार आहे.

    कोपर पुलाचे (Kopar Bridge Work )काम अंतिम टप्प्यात असून तो गणेश चतुर्थीला सुरू करण्यात येईल. कोपर पुलाचे काम ८५ टक्के पूर्ण झाले असून फक्त १५ टक्के काम बाकी आहे. पावसाने उघडीप दिली तर बाकी राहिलेले डांबरीकरण आणि रंगरंगोटीचे काम लवकरात लवकर मार्गी लावून पूल गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच खुला करण्याचा पालिकेचा प्रयत्न राहील, असा दावा कल्याण डोंबिवली पालिकेच्या(KDMC) शहर अभियंता सपना देवनपल्ली- कोळी यांनी केला आहे . त्यामुळे लवकरच डोंबिवलीकरांची चिंता मिटणार आहे.