कोपर पुलावरील उच्च दाबाच्या वीज वाहिन्या रेल्वे ट्रॅक खालून टाकण्याचे काम सुरु

प्रशांत जोशी, डोंबिवली : डोंबिवली पूर्व पश्चिम जोडणाऱ्या कोपर येथील पुलावर अतिउच्च दाबाच्या वीज वाहिन्या आहेत सध्या रेल्वे सेवा बंद असल्याने कोपर पूल पाडण्याचे काम सुरू होत आहे महावितरण कंपनीने

प्रशांत जोशी, डोंबिवली : डोंबिवली पूर्व पश्चिम जोडणाऱ्या कोपर येथील पुलावर अतिउच्च दाबाच्या वीज वाहिन्या आहेत सध्या रेल्वे सेवा बंद असल्याने कोपर पूल पाडण्याचे काम सुरू होत आहे महावितरण कंपनीने पुलाखाली रेल्वे ट्रेकच्या खाली दोन मीटर खोल उच्च दाब वाहिन्या टाकण्याचे काम सुरू केले असून यासाठी दोन मशीन मागवण्यात आल्या आहेत .

गेले काही महिने कोपर पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. कोपर पुलावर फुटपाथवर पश्चिमेला वीज पुरवठा करणाऱ्या ९ केबल आहेत. त्या कुणी काढायच्या व खर्च कोण करणार यावर पालिका ,रेल्वे व महावितरण यांच्यात वाद होता. पण अचानक कोरोनामुळे रेल्वे सेवा बंद पडली. त्याचा उपयोग करण्याचे ठरवण्यात आले. सध्या पुलावरील वीज वाहिन्यांना हात न लावता रेल्वे ट्रॅक खाली २ मीटर खोल खणून उच्च दाबाच्या ९ केबल भूमिगत टाकण्यात येणार असून सध्या ट्रॅकवर खड्डा खणण्याचे काम २५-३०कर्मचारी करत आहेत. महावितरणचे अधिकारी जी एम पाटील यांनी २ मशीन आणण्यात आल्या असून सध्या खड्डे करण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे ते म्हणाले. तर महावितरण डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड यांना विचारले  असता त्यांनी सध्या रेल्वे सेवा बंद असल्याने कामाला सुरुवात केली असून पुलावरील केबल प्रत्यक्ष पूल पाडण्याचे काम सुरू झाले की त्या केबल काढण्यात येतील. या केबल १२० मीटर लांब  असून सुमारे १ कि मी लांबीच्या ९ केबल आहेत. यामुळे सर्व केबल आता भूमिगत असल्याने पश्चिमेच्या बाजूला अखंडित वीज पुरवठा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला डॉबिवली  जुन्या कोपर पुलाच्या जागी नव्याने उभारल्या जाणाऱ्या पुलाची लांबी ५० मीटर इतकीच राहील. तर ७.५ मीटर रुंदीचा हा पूल १८.२०, १९.२० आणि १०.५ अशा तीन स्पॅनमध्ये तयार केला जाणार आहे.