लॉकडाऊन वाढण्याच्या भीतीने मजुरांनी चालत घर गाठण्याचा बांधला चंग

भिवंडी : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ४० दिवसांचा लॉकडाऊन ३ मे पर्यंत आहे. महाराष्ट्रात विशेष करून मुंबई एमएमआरडीए क्षेत्रात कोरोनाबधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे .त्यामुळे ३ मे नंतर ही

भिवंडी : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी  ४० दिवसांचा लॉकडाऊन ३ मे पर्यंत आहे. महाराष्ट्रात विशेष करून मुंबई एमएमआरडीए क्षेत्रात कोरोनाबधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे .त्यामुळे ३ मे नंतर ही लॉक डाऊन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे .त्या भीतीने मुंबई भागात मोलमजुरी करून राहणाऱ्या मजूर कामगारांनी नाईलाजास्तव आपल्या गावाकडची वाट धरली आहे .

मुंबई कांजूरमार्ग येथे झोपडपट्टीत राहणारे कुटुंबीय सध्या काम बंद असल्याने हाती काम ही नाही व उरलासुरला गाठीला असलेला पैसा ही संपला .मग नाईलाजास्तव या कुटुंबीयांनी अकोला जिल्ह्यातील आपल्या गावापर्यंतची ६०० किलोमीटरची पायपीट सुरू केली. डोक्यावर गाठोडे ,कडेवर लहानग्यांना घेऊन त्यांची भर उन्हातली ही पायपीट मन विषण्ण करणारी आहे .

मुंबई येथे महिला घरकाम तर पुरुष मंडळी रोजंदारीवर काम करीत असताना सध्या काम बंद आहे. शिधावाटप पत्रिका नसल्याने धान्यही मिळत नाही. जेवणाची पाकिटे कधी मिळतात तर कधी उपाशीपोटी राहावे लागत असल्याने नाईलाजास्तव गावी निघालो असल्याची कहाणी सांगत असतानाच गावी पोहचलो तरी १४ दिवस शिवारात शेतात राहू पण तेथे खायला कोण देणार ही विवंचना आहेच असे दुःख सुनीता संजय खुराडे या महिलेने बोलून दाखविले .शासन  कामगारांसाठी मोठ्या प्रमाणावर धान्य जेवण उपलब्ध करून देत असले तरी आज ही बऱ्याच जणांपर्यंत ते पोहचत नसल्यानेच त्यांची भूक तळपत्या उन्हात डांबरी रस्त्यावरून गावाच्या ओढीने निघाले आहेत हे वास्तव आहे .