dombivli thakurli railway station

ट्रॅकवर ठेवलेले  एक मोठ्या आकाराचा, सुमारे 15 लहान दगडी बाजूला केल्या. याप्रकरणी डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करत दगड कोणी ठेवले याचा तपास पोलीस करत होते. अखेर या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं असून त्याने खोडसाळ वृत्तीने हा प्रकार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

    कल्याण : धावत्या रेल्वे गाड्यांवर दगडफेक करण्याच्या घटनांनंतर आता ट्रॅकवरही दगडी ठेवण्याचा प्रकार मध्य रेल्वेवर घडला आहे. डोंबिवलीत रेल्वे स्थानकानजीक हा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, मोटरमनच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

    शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास डोंबिवली ते ठाकुर्ली स्थानकांच्या दरम्यान रुळावर दगडी ठेवलेल्या आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी डोंबिवली रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

    या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं असून त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे. खोडसाळपणाने त्याने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसानी दिली दरम्यान सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या कर्जत लोकलच्या मोटरमनन रुळावर दगड असल्याचे पाहिले त्यांनी तत्काळ प्रसंगावधान राखत लोकल थांबवत या बाबत रेल्वेला माहिती दिली व हा प्रकार उघडकीस आला.

    डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या ट्रॅकवर ठेवलेले  एक मोठ्या आकाराचा, सुमारे 15 लहान दगडी बाजूला केल्या. याप्रकरणी डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करत दगड कोणी ठेवले याचा तपास पोलीस करत होते. अखेर या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं असून त्याने खोडसाळ वृत्तीने हा प्रकार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.