letter to tahsildar

मुरबाड : प्रस्तावित काळू धरण परिसरातील(kalu dam area) आदिवासी जमिनी खरेदी करण्याचा(land sell at chepest prize) सपाटा सध्या सुरू असून जमिनीचे हे व्यवहार थांबवावेत, अशी मागणी आदिवासी संघर्ष समितीचे अध्यक्ष राजाभाऊ सरनोबत यांनी राज्याचे नोंदणी महानिरीक्षक यांच्याकडे केली आहे.

मुरबाड : प्रस्तावित काळू धरण परिसरातील(kalu dam area) आदिवासी जमिनी खरेदी करण्याचा(land sell at cheapest prize) सपाटा सध्या सुरू असून जमिनीचे हे व्यवहार थांबवावेत, अशी मागणी आदिवासी संघर्ष समितीचे अध्यक्ष राजाभाऊ सरनोबत यांनी राज्याचे नोंदणी महानिरीक्षक यांच्याकडे केली आहे.

काळू धरणाला मुंबई उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखविल्यानंतर काळू धरण परिसरातील आदिवासी जमिनी खरेदी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. आदिवासींच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत कवडीमोल भावाने या जमिनी घाईघाईने खरेदी केल्या जात आहेत. त्यामुळे भविष्यात धरण निर्मितीनंतर प्रकल्पग्रस्त म्हणून मिळणाऱ्या लाभापासून हे आदिवासी वंचित राहण्याची भीती सरनोबत यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे लॉकडाऊन असतानाही अत्यंत वेगाने या परिसरातील झालेल्या जमीन खरेदी प्रकरणांची चौकशी करावी.खरेदी करणारे खरेच मुळ शेतकरी आहेत का? जमिनी खरेदी करण्यासाठी या टोळ्यांना कुणी पैसा पुरवत आहे का ?  याची चौकशी करून या परिसरातील आदिवासी जमीन खरेदी विक्रीचे सर्व व्यवहार बंद करावेत अशी मागणी सरनोबत यांनी केली आहे.