कळव्यात दरड कोसळून ५ जणांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती -शासनाकडून मदत जाहीर

कळवा पूर्व येथील घोळाई नगर डोंगर परिसरात दरड कोसळल्याने(landslide) चार घरांचे(4 Houses Collapsed In Landslide) नुकसान झाले आहे.पाच जणांचा दरड कोसळल्याने मृत्यू झाला आहे.

    ठाणे : ठाणे(Thane) महानगरपालिका हद्दीतील कळवा पूर्व येथील घोळाई नगर डोंगर परिसरात दरड कोसळल्याने(landslide) चार घरांचे(4 Houses Collapsed In Landslide) नुकसान झाले आहे.पाच जणांचा दरड कोसळल्याने मृत्यू झाला आहे. दरम्यान शेजाऱ्यांनी तात्काळ चार नागरिकांना बाहेर काढले. अद्यापही काही नागरिक अडकल्याची शक्यता असल्याने घटना स्थळी अग्निशमन दलाचे शोधकार्य सुरू आहे.

    कळवा पूर्वेला घोलाईनगर, अपर्णाराज सोसायटी समोरील चर्च रोड येथे चर्चजवळील काही रुम कोसळल्या. या रुम कोसळल्याने ढिगार्‍याखाली काही माणसे अडकली असल्याची माहिती मिळाली आहे. अजून बचावकार्य सुरु आहे.

    कळवा पूर्व येथील घोलाई नगर दुर्घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांना सरकारतर्फे पाच लाखांची मदत पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली. तसेच जखमींवरील संपूर्ण उपचारांचा सर्व खर्च केला जाईल. तसेच डोंगरावरील राहणाऱ्या कुटुंबियांच स्थलांतर करण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले.