dark in kalyan

गाळेगाव परिसरातील आर एस डेअरी फार्म येथील स्मशानभुमीत मृतदेहावर मोबाईलच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करण्याची वेळ(last rituals in mobile light) नातेवाईकांवर आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

दत्ता बाठे, कल्याण : गाळेगाव परिसरातील आर एस डेअरी फार्म येथील स्मशानभुमीत मृतदेहावर मोबाईलच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करण्याची वेळ(last rituals in mobile light) नातेवाईकांवर आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘अ’ प्रभाग क्षेत्रातील गाळेगाव डेअरी फार्म येथील स्मशान भूमी रोड वरील तसेच स्मशानभूमीतील पथदिवे बंद असल्याने चक्क मोबाईल बॅटरीच्या प्रकाशात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ नागरिकांवर आल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

सम्राट अशोक नगर येथील रहिवासी व भारतीय लष्करातील माजी सैनिकाचे वडील लक्ष्मण धुमाळ यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. यावेळी भारतीय लष्करातील अनेक आजी-माजी लष्कर अधिकारी व सैनिक उपस्थित होते. तसेच बहुसंख्येने येथील नागरिक अंत्यविधीमध्ये सहभागी झाले होते. अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमी रस्त्यावरून जाताना रस्त्यावरील पथदिवे बंद आढळून आले स्मशानभूमीत एकही दिवा सुरू नव्हता. तसेच स्मशानभूमील बर्निंग स्टॅन्ड दुरावस्थेत आहे. तसेच स्मशानभूमी परिसरात सर्वत्र कचर्याचे साम्राज्य पसरले होते. काळोख्या अंधारात मोबाईल बॅटरीच्या प्रकाशात अंत्यविधी करावा लागल्याने अंत्यविधीसाठी उपस्थित असलेल्या आजी-माजी लष्करी अधिकाऱ्यांनी आणि आजी-माजी सैनिकांनी नाराजी तीव्र नाराजी व्यक्त केली. अंत्यविधी साठी आलेल्या नागरिकांना अंतिम विधीसाठी मनपाकडून पथदिव्यासारखी मुलभुत सुविधा सुरळीतपणे कार्यन्वित होत नसेल तर दुर्दैव म्हणावे लागेल अशी व्यथा या निमित्ताने करदाते नागरिक व्यथित करत होते.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा ‘अ’ प्रभाग क्षेत्रातील विद्युत विभाग किती अकार्यक्षम अकार्यक्षम आहे हेच या घटनेतून सिद्ध झाले आहे. अत्यंत महत्त्वाच्या आणि गरजेच्या ठिकाणी सुद्धा पथदिवे नसल्याने नागरिकांनी विद्युत विभागाचे वाभाडे काढले. ही स्मशानभूमी अत्यंत जुनी असून याठिकाणी यादव नगर, लहुजी नगर, मोहने, गाळेगाव, जेतवन नगर, एन आर सी कॉलनी परिसर, टिप्पन्नानगर, महात्मा फुले नगर, पंचशील नगर, आदी भागातील नागरिक अंत्यविधी करण्यासाठी येतात. परंतु येथील नागरिकांना महापालिकेकडून कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा मिळत नाहीत.

कोट्यवधी रुपयेच्या माध्यमातून पालिका टॅक्स जमा करीत असून नागरिकांना मूलभूत आणि आवश्यक ठिकाणी पथदिवे सुरू ठेवू शकत नसेल तर विद्युत विभाग काय काम करतो की झोपा काढतो अशी संतप्त भावना येथील समाजसेवक पांडुरंग गायकवाड यांनी व्यक्त केली.

पालिकेने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच लवकरात लवकर विद्युत पुरवठा सुरळीत करावा अन्यथा विद्युत विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असे येथील समाजसेवक सुशील आरके, संदीप राजगुरू, किशोर शिंदे, नवनाथ केदार, विनोद धुमाळ, समाजसेवक सतीश कराळे अशोक खेत्रे भीमराव खेत्रे आधी कार्यकर्त्यांनी सांगितले.

कल्याण डोंबिवली महापालिका  ‘अ’ प्रभाग क्षेत्रातील विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, स्माशनभुमी परिसरातील पथदिवे समाजकटंक फोडतात याबाबत पोलीस स्टेशन मध्ये पत्र दिले. असुन पथदिवे बंद असल्याची तक्रार आल्यास तातडीने सुरू करण्यात येतात.