Laxman Murdeshwar, owner of Misal, who was involved in transporting Misal across the seas, died due to corona.

ठाणे :  ठाणे,मुंबई,परिसरात राहणारे ठाण्यात आले की त्यांचे पाय वळतात ते तहसीलदार कार्यालयाजवळ असलेल्या मामलेदार चमचमीत मिसळ खाण्याकडे, ठाण्याची मामलेदार मिसळ म्हणजे खवय्यांची मेजवानीच ठरत होती. तहसीलदार मिसळ ते ब्रॅण्ड मामलेदार मिसळ बनविणारे मालक यांचा कोरोनाने दुःखद निधन झाले. मामलेदार मिसळचे (mamledar misal) मालक लक्ष्मण मुरडेश्वर (Laxman Murudeshwar) यांचं निधन झालं आहे.

मुरडेश्वर ८४ वर्षाचे होते. १९५२ पासून  मुरडेश्वर  यांच्या वडिलांनी नरसिंह मूरडेश्वर यांनी तहसीलदार मिसळीची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यांच्यानंतर लक्ष्मण शेठ यांनी तहसीदार मिसळीचे ब्रँडिंग मामलेदार मिसळ करून प्रसिद्धी मिळवली. तहसीलदार कार्यालयाच्या शेजारी चविष्ट, ठसकेदार मिसळ खवय्यांना सातत्याने उपलब्ध करुन दिली.

या ठसकेदार मिसळीची चव ठाण्यात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या हॉटेलमध्ये खवय्यांना मिळालीच नाही. यामुळे ठाणे, मुंबई येथील कामानिमित्त ठाण्यात आल्यानंतर खवय्ये मामलेदार मिसळीचा आनंद घेतल्याशिवाय ठाणे सोडीत नव्हते. त्यामुळे सकाळी नाश्ता तहसीलदार मिसळमध्ये मिळत होता. हळूहळू मिसळ दुपारचे जेवण झाले, त्यानंतर काहींचे संध्याकाळचे जेवणही होऊन बसले. साध्या हॉटेलात लोक गर्दी करीत होते त्यामुळे रांगा लावून मिसळ खाण्याचा आनंद खवय्ये घते आहेत.

झणझणीत मिसळमुळे तिखट लागणाऱ्या खवय्यांची गरज पाहून हॉटेलच्या बाहेर ताक सुरू केले. त्यालाही ठाणेकरांनी आणि खवय्यांनी उदंड प्रतिसाद दिला ठसकेदार मिसळ आणि ताक हे समीकरण मामलेदार मिसळचे होते. अनेकवर्षं एकसारखी चव असलेली मिसळ ठाणेकरांचे आकर्षण ठरली.

अनेक वर्षे मिसळीचे हॉटेल चालविणारे मुरडेश्वर हे ठाण्यात प्रसिद्ध झाले. अनेकांचे भेटीचे आणि नाश्त्याची ठेक मामलेदार मिसळ ठरली. पूर्वी तहसीलदार मिसळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मिसळीचे ब्रँडिंग हे मामलेदार मिसळ झाले.