कोरोना तपासणीसाठी  शासनाने ठरवुन दिलेल्या दरापेक्षा जादा शुल्क आकारल्यास नियमानुसार कायदेशीर कारवाई करणार – आयुक्त डॉ.पंकज आशिया

भिवंडी - भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रूग्णांची स्वॅब तपासणी जी ५० नमुने तपासण्यात येत होती. त्याची क्षमता आता वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारकडून रोज ३०० मोफत तपासणी होणार आहेत

भिवंडी – भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रूग्णांची स्वॅब तपासणी जी ५० नमुने तपासण्यात येत होती. त्याची क्षमता आता वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारकडून रोज ३०० मोफत तपासणी  होणार आहेत आणि सदरच्या तपासण्या आता  टाटा आमंत्रा येथे होत होत्या. आता त्या तपासण्या रईस हायसकूलमध्ये होणार  आहेत. तसेच जे खासगी टेस्ट करताना जास्त  शुल्क घेत आहेत  त्यावरदेखील नियंत्रण आणण्यात  येणार आहे. जे खाजगी लॅबचालक कोरोना तपासणी करण्यासाठी  शासनाने ठरवुन दिलेल्या दरापेक्षा जादा शुल्क आकारतील त्यांच्या विरोधात नियमानुसार  कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती महानगरपालिका आयुक्त डॉक्टर पंकज आशिया यांनी दिली आहे.

तसेच खुदाबक्ष सांस्कृतिक केंद्र येथे १२० क्षमतेचे कोविड हॉस्पिटल चालू करण्यात येणार आहेत, तर नेहरू शाळेत १५० बेड क्षमता असलेले सेंटर चालू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर रईस हायस्कूल येथे ४०० बेड क्षमता असलेले हॉस्पिटल चालू करण्यात आले आहे. अशी माहिती आयुक्त यांनी दिली आहे.  ताप  येत असेल आणि श्वास घ्यायला त्रास होत असेल तर तातडीने महानगरपालिकेतर्फे सुरू करण्यात आलेल्या ताप तपासणी केंद्र येथे संपर्क साधावा. तसेच नागरिकांनी स्वतः तपासणी करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन देखील आयुक्त यांनी केले आहे.