
कोरोना से मरेंग कम लॉकडाऊन से मरेंग हम ... महाराष्ट्र मे कोरोना पहले खत्म होगा ? या व्यापारी ? असे फलक लावून कळव्यातील व्यापा-यांनी राज्य सरकारचा निषेध केला. ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनात सराफ व्यापारी, कपडे विक्रेते, अशा अनेक व्यापारी रस्त्यावर उतरले होते. ज्या प्रमाणे किराणा मालाच्या दुकानांना परवानगी देण्यात आली आहे त्याप्रमाणे आम्हालाही परवानगी दिली जावी अशी मागणी यावेळी व्यापा-यांनी केली. नवीन नियमावलीची चोख अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्वच ठिकाणी पोलीसांनी कडक बंदोबस्त ठेवीत दुकाने बंद केली. तसेच पोलिसांनी मेगाफोनद्वारे जनतेला जनजागृती केली.
ठाणे : वाढता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने शनिवार आणि रविवार संपूर्ण लॉकडाऊनचे आदेश दिले असतानाच मंगळवारी अचानक संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आल्याने व्यापा-यांमध्ये संताप पसरला हेाता. ठाणे, नवी मुंबई, कल्याण डेांबिवली, उल्हासनगरसह आजूबाजूच्या परिसरातील व्यापा-यांनी रस्त्यावर उतरून निषेध केला. कोरोना से मरेंग कम, लॉकडाऊन से मरेंग हम … महाराष्ट्र मे कोरोना पहले खत्म होगा ? या व्यापारी ? अशी फलकबाजी करीत कळवा येथील व्यापा-यांनी राज्य सरकारचा निषेध केला.
कोरोनाची साखळी तेाडण्यासाठी राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध घातले आहेत शासनाने शनिवार आणि रविवार (विकेंड) लॉकडाऊनची घोषणा केली. सोमवार ते शुक्रवारपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचे राज्य शासनातर्फे तेांडी सांगण्यात आले होते. मात्र ज्यावेळी लेखी आदेश (जीआर) निघाले त्यांनी मात्र व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
ठाणे नवी मुंबई कल्याण डेांबिवलीसह सर्वच शहरात मंगळवारी सकाळी पोलीसांनी रस्त्यावर उतरून सर्व दुकाने बंद करायला सुरूवात केली त्यामुळे व्यापा-यांमध्ये गोंधळ आणि संताप पसरला होता. ठाणे महापालिकेने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने या निर्णयाचा कळवा, ठाणे, दिवा येथील व्यापा-यांनी तीव्र निषेध केला. ठाण्यातील राम मारुती रोड रिटेलर्स असोसिएशनच्या वतीने मानवी साखळी करून हातात फलक घेऊन निषेध व्यक्त केला. तर कळवा बाजारपेठेत व्यापा-यांनी रस्त्यावर उतरून प्रत्येक दुकानासमोर निषेधाचे फलक लावले होते.
कोरोना से मरेंग कम लॉकडाऊन से मरेंग हम … महाराष्ट्र मे कोरोना पहले खत्म होगा ? या व्यापारी ? असे फलक लावून कळव्यातील व्यापा-यांनी राज्य सरकारचा निषेध केला. ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनात सराफ व्यापारी, कपडे विक्रेते, अशा अनेक व्यापारी रस्त्यावर उतरले होते. ज्या प्रमाणे किराणा मालाच्या दुकानांना परवानगी देण्यात आली आहे त्याप्रमाणे आम्हालाही परवानगी दिली जावी अशी मागणी यावेळी व्यापा-यांनी केली. नवीन नियमावलीची चोख अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्वच ठिकाणी पोलीसांनी कडक बंदोबस्त ठेवीत दुकाने बंद केली. तसेच पोलिसांनी मेगाफोनद्वारे जनतेला जनजागृती केली.
कल्याण डोंबिवलीत निषेध
राज्य शासनाच्या निर्देशांनुसार कल्याण डोंबिवलीतही सोमवारी रात्रीपासून कठोर कोवीड निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र हे निर्बंध घालताना शासकीय स्तरावर कोणत्याही प्रकारची सुस्पष्टता नसल्याने कल्याण डोंबिवलीतील व्यापारी वर्गात मोठा संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे काही ठिकाणी दुकाने सुरू होती तर काही ठिकाणी बंद असल्याचे दिसून आले. कल्याण डोंबिवलीतील सर्व व्यापारी रस्त्यावर उतरले होते. कोरोना फक्त आमच्या दुकानातूनच पसरतो का? दुकाने बंद केली तर आम्ही खायचे काय? असा संतप्त सवाल दुकानदार आणि व्यापाऱ्यांनी केला .
उल्हासनगमध्ये संताप
ठाणे, मुंबई पट्टय़ातील व्यापारी उलाढालीची महत्त्वाची व स्वस्तामधील बाजारपेठ म्हणजे उल्हासनगरची ओळख आहे. दररोज रोजगार आणि व्यापार उलाढाल करण्यासाठी हजारो व्यावसायिक, कामगार उल्हासनगरात येत असतात. शहरातील मुख्य व्यवसायांवर अवलंबून असलेली अनेक कुटुंबे जोडव्यवसाय करीत असतात. येथील गजानन मार्केट कपडयासाठी प्रसिध्द आहे तसेच फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स मार्केट वस्तूला मोठी मागणी आहे. हजारो कामगारांचे कुटूंब या मार्केटवर अवलंबून आहे. लॉकडाऊनच्या निर्णयामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे उल्हासनगरमधील सर्व व्यापा-यांनीही रस्त्यावर उतरून सरकारच्या निर्बंधाचा निषेध करीत संताप व्यक्त केला.
तर उपासमारीची वेळ येईल …
गेल्या वर्षी लॉकडाऊनला व्यापा-यांनी सहकार्य केले, सरकार गोरगरीबांचा विचार करते असे सांगितले जाते. मग व्यापारी हे गोरगरीबांमध्ये मोडत नाहीत का ? त्या ठिकाणी काम करणारे कामगार हे गरीब नाहीत का ? असा सवाल व्यापा-यांकडून उपस्थित केला जात आहे. व्यापा-यांना दुकानाचे भाडे, कामगारांचे वेतन, वीज बील भरावे लागत आहेत. दुकान बंद ठेवली तर हे सगळे कसे भरणार ? दुकाने बंद राहिली तर त्यावर अवलंबून असलेल्या कुटूंबावर उपासमारीची वेळ येईल या सर्व प्रश्नांची सरकारने उत्तर द्यावीत असा संताप व्यापा-यांनी व्यक्त केला.
आत्महत्येशिवाय पर्याय नाही…
लॉकडाऊनने कोरोना संपणार आहे कि नाही, हे माहित नाही. पण व्यापारी नक्की संपणार आहे. त्यामुळे सरसकट सर्वच दुकाने बंद करून नका. मागील लॉकडाऊनमध्ये केाणताही टॅक्स माफ झाला नाही. सगळे पैसे व्यापारी व सर्वसामान्यांना भरावे लागले. दुकाने बंद असतील तर पैसे आणयचे कुठून ? मग आत्महत्येशिवाय पर्याय नाही. असा संतप्त सवाल व्यापा-यांकडून विचारला जात आहे.