महानगरपालिका परिवहन सेवेच्या बसमधून दारू वाहतूक करणाऱ्या चालकावर कारवाई- १२,३०,५५० रु. किमतीचा मुद्देमाल जप्त

पालघर : महानगरपालिका परिवहन सेवेच्या बसमधून दारू वाहतूक करणाऱ्या चालकावर कारवाई करण्यात आली आहे. त्याच्याकडून १२,३०,५५० रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातल्या

 पालघर : महानगरपालिका परिवहन सेवेच्या बसमधून दारू वाहतूक करणाऱ्या चालकावर कारवाई करण्यात आली आहे.  त्याच्याकडून १२,३०,५५० रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातल्या नालासोपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या आचोळा इथल्या चंदननाका इथे रस्त्यावर रविवारी रात्री ८.१० वाजताच्या सुमारास आरोपी चालक निजाम होडेकर  हा प्रोव्हिशन गुन्ह्याचा माल प्रवासी वाहतूक करणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिका  परिवहन सेवेच्या ( बेस्ट ) च्या बसमधून लॉकडाऊनच्या नियमांचा भंग करत बेकायदेशीररित्या दारू साठ्या सहित पोलिसांना सापडला. आरोपीकडून एकुण १२,३०,५५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्या विरुद्ध तुळींज पोलीस ठाण्यात कलम १८८ सह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ ई, ८१, ८२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ही कारवाई तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तुळींज पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी केली आहे.