लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणखी १३ जणांवर भिवंडीत फौजदारी गुन्हा दाखल

भिवंडी: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने निर्देशित केलेल्या संचारबंदी व लॉकडाऊनच्या आदेशाचा भिवंडी शहरातील नागरिक फज्जा उडवत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत.चार

 भिवंडी: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने निर्देशित केलेल्या संचारबंदी व लॉकडाऊनच्या आदेशाचा भिवंडी शहरातील नागरिक फज्जा उडवत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत.चार दिवसांपूर्वीच कोटरगेट येथे हुक्का पार्लरवर कारवाई करून २२ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला असतानाच आणखी १३ जणांवर शहर पोलिसांनी शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल केल्याची घटना कोटरगेट मशीदीच्या आवारात घडली आहे.वकास अहमद सगीर,सालीप साजीद मोमीन,कासीम मो.साकी अन्सारी,सिमरान मो.अस्लम अन्सारी,मेहबूब अहमद बशीर मोमीन,सैफ फिरोज खान,सोयब हमीद सैयब,शकील इरफान सैय्यद,अनिस मो.हुसेन शेख,दानिश समसुदीन मोमीन,साजीद शब्बीर अहमद मोमीन,फुरकान मो.अस्लम अन्सार,मो.शकील इलियास मोमीन आदींनी एकत्रित जमून शासनाने निर्देशित केलेल्या सूचनांच्या आदेशाचा फज्जा उडवल्याने शहर पोलिसांनी या १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.या घटनेचा अधिक तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (प्रशासन )किरण कबाडी करीत आहेत.