लॉकडाऊनमध्ये सुरु आहे जगण्याची लढाई – पारंपरिक व्यावसायिकांनी धरली अत्यावश्यक सेवांची कास

मुरबाड: लॉकडाऊन काळात केवळ अत्यावश्यक सेवा व्यवसायांना परवानगी असल्याने इतर व्यवसाय ठप्प आहेत.त्यामुळे या व्यावसायिकांनी आपल्या पारंपरिक व्यवसायांकडे पाठ फिरवून अत्यावश्यक सेवा व्यवसायांकडे धाव

 मुरबाड: लॉकडाऊन काळात केवळ अत्यावश्यक सेवा व्यवसायांना परवानगी असल्याने इतर व्यवसाय ठप्प आहेत.त्यामुळे या व्यावसायिकांनी आपल्या पारंपरिक व्यवसायांकडे पाठ फिरवून अत्यावश्यक सेवा व्यवसायांकडे धाव घेतली आहे. लॉकडाऊन काळात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सर्वच व्यवसाय ठप्प आहेत. भाजीपाला, दुध, मेडिकल, फळे, शेतीसंबधित बी, बियाणे, खते, किराणा, अशा अत्यावश्यक सेवांची दुकानेच फक्त ठराविक वेळेत सुरू आहेत.त्यामुळे सलून, चप्पल,  बांगडी, भांडी, कपडे,  स्टेशनरी विक्रेत्यांवर अक्षरशः उपासमारीचे भयाण संकट उभे राहिले आहे. हातावर पोट असणारे हातगाडी व्यावसायिक व फेरीवाले यांचीही मोठ्या प्रमाणात वाताहत सुरू आहे. कुटुंबाचे पोट कसे भरावे या विवंचनेत ही मंडळी असतांना अत्यावश्यक सेवा दुकानांना परवानगी असल्याने हे व्यावसायिक आपली पारंपरिक व्यवसायाच्या दुकानांना टाळे ठोकून भाजीपाला, कांदे, बटाटे, दुध, फळे विक्री अशा व्यवसायांकडे वळले आहेत. या नव्या व्यवसायाबाबतीत कोणतेही ज्ञान किंवा अनुभव त्यांना नाही, पण यावर त्यांच्या कुटुंबाची गुजराण होते, असे विक्रेते सांगतात.

गेले महिनाभर माझे सलून बंद आहे.जवळचे शिल्लक पैसेही संपले आहेत. कोरोनामुळे सलून किती दिवस बंद राहिल, याची शाश्वती नसल्याने मी सध्या भाजीपाला विक्री करत आहे.यातून पोटापुरती कमाई तरी होते. – रूपेश पावडे (केशकर्तन व्यावसायिक)