कल्याण-डोंबिवलीत लॉकडाऊन शिथिल मात्र हॉटस्पॉट क्षेत्रात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन

कल्याण- डोंबिवलीत कोरोनाचा वाढता  प्रसार पाहून महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी  १२ जुलै ते १९ जुलै या कालावधीत लॉकडाऊन  लागू केला होता. आता या लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणण्याचा निर्णय आज घेण्यात आला असून  काही कंटेनमेंट झोन असलेल्या प्रभागांमध्ये लॉकडाउन ३१ जुलैपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे.

कल्याण डोबिंवली महापालिका क्षेत्रात कोरोनाच्या वाढत्या फैलावाचा धोका लक्षात घेऊन  २ जुलै ते १२ जुलै लॉकडाऊन जाहीर केलेला या काळात सकाळी ७ ते १० या वेळेत दुधाची डेअरी, किराणा सामान आणि मेडिकल सुरु ठेवण्यात आली होती. मात्र त्यानंतरही कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने  १२ जुलै ते   १९ जुलैपर्यंत लॉकडाउनला मुदतवाढ देण्यात आली होती. अखेर महापालिकेनं लॉकडाउन शिथिल करण्यात येत असल्याबद्दलचे आदेश काढले असून कंटेनमेंट झोन असलेल्या प्रभागांमध्ये लॉकडाउन ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे.