कल्याणमधील(lockdown rules violation) ६० फुटी रोड येथे बुधवारी संध्याकाळी संपन्न होत असलेल्या लग्न समारंभात मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित असल्याची माहिती ड प्रभाग क्षेत्र अधिकारी वसंत भोंगाडे यांना मिळाली. ही माहिती मिळताच त्यांनी आणि त्यांच्या पथकाने पाहणी केली. या विवाह समारंभात सुमारे ७०० लोक(700 people present for marriage) उपस्थित असल्याचे दिसून आले.

    कल्याण : कोरोना रुग्णांची संख्या(corona patients) वाढत असल्याने कल्याण डोंबिवली(kalyan dombivali) महानगरपालिका क्षेत्रात पालिका आयुक्तांनी अनेक निर्बंध लावले आहेत. असे असतांना देखील लग्न समारंभात नियमांचे उल्लंघन करून गर्दी जमविणाऱ्यांच्या विरोधात महापालिकेने गुन्हा दाखल केला असून ही घटना कल्याण पूर्वेत घडली आहे.

    कल्याण पूर्वेतील ६० फुटी रोड, गॅस कंपनी शेजारी येथे बुधवारी संध्याकाळी संपन्न होत असलेल्या लग्न समारंभात मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित असल्याची माहिती ड प्रभाग क्षेत्र अधिकारी वसंत भोंगाडे यांना मिळाली. ही माहिती मिळताच त्यांनी आणि त्यांच्या पथकाने पाहणी केली. या विवाह समारंभात सुमारे ७०० लोक उपस्थित असल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, तोंडाला मास्क न लावणे अशा प्रकारचे बेजबाबदारपणाचे वर्तन करून कोविड-१९ च्या नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले.

    यामुळे या विवाह सोहळ्याचे आयोजक राजेश यशवंत म्हात्रे, चिंचपाडा, कल्याण पूर्व आणि महेश कृष्णा राऊत, कासारवडवली, जि. ठाणे यांच्या विरुद्ध भा.द.वि. कलम १८८, २६९, २७० आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ५१, तसेच कोविड-१९ उपाययोजना नियम ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सध्या कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी वारंवार हात धुणे, सार्वजनिक ठिकाणी वावरताना न चुकता मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करावा,असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.