महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या ई- पुस्तकांचा ३७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला लाभ

कल्याण : कल्याण पश्चिम भागातीलमहाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीस अडथळा येऊ नये म्हणून ११ मे पासुन इयत्ता पहिली ते दहावी मराठी व

कल्याण : कल्याण पश्चिम भागातील  महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांच्या  शैक्षणिक वाटचालीस अडथळा येऊ नये म्हणून ११ मे पासुन इयत्ता पहिली ते दहावी मराठी व इंग्रजी माध्यमाची मोफत ई-पुस्तके ईमेल किंवा व्हॉट्सअॅप द्वारे देण्याचा उपक्रम हाती घेतला होता. या उपक्रमाला विद्यार्थी आणि पालकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत ३७०० हून अधिक विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला आहे. अजुनही अनेक विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत.

ही ई-पुस्तके कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, ठाणे, दिवा, नाशिक, पुणे, शहापूर, पनवेल व इतर शहरातील विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार देण्यात आली. एवढेच नव्हे तर एम.पी.एस.सी ची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील याचा फायदा झाला आहे. लॉकडाऊन काळात पाठ्यपुस्तकांची मोठ्या प्रमाणात मागणी होती. त्यानुसार ती विद्यार्थांना उपलब्ध करून देण्यात आली असून अजूनही ज्यांना पुस्तक पाहिजे असतील त्यांनी मनविसेशी संपर्क साधण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे कल्याण शहर अध्यक्ष विनोद केणे यांनी केले आहे.