कल्याणमधील कोरोना तपासणी लॅबची चार तासाच्या आत महावितरणकडून वीजजोडणी पूर्ण

कल्याण : महानगरपालिकेच्या मागणीनंतर कल्याण पश्चिम येथील कोरोना विषाणूच्या तपासणी लॅबला महावितरणकडून अवघ्या चार तासांच्या आत नवीन वीजजोडणी देण्यात आली. कल्याण पश्चिम विभागाने तत्परतेने केलेल्या या

कल्याण : महानगरपालिकेच्या मागणीनंतर कल्याण पश्चिम येथील कोरोना विषाणूच्या तपासणी लॅबला महावितरणकडून अवघ्या चार तासांच्या आत नवीन वीजजोडणी देण्यात आली. कल्याण पश्चिम विभागाने तत्परतेने केलेल्या या कामामुळे तपासणी लॅब तातडीने सुरु करण्यात मोलाची मदत झाली आहे.

कल्याण पश्चिम येथील डीएसडी शाळेसमोरील झोझवाला कॉम्प्लेक्स येथे कोविड-१९ च्या तपासणी लॅबला तात्काळ वीजजोडणी देण्याची मागणी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांनी मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांच्याकडे बुधवारी (२७ मे) केली होती. त्यानुसार मुख्य अभियंता अग्रवाल यांनी दिलेल्या निर्देशानुसार कल्याण पश्चिम विभागाने आवश्यक कामे करून या लॅबला अवघ्या चार तासांच्या आत २५ किलोव्होल्ट वीजभाराची वीजजोडणी दिली. अधीक्षक अभियंता सुनील काकडे, कार्यकारी अभियंता दिगंबर राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त कार्यकारी अभियंता विजय यादव व मनीष डाकरे, सहायक अभियंता नितीन वाके, प्रतीक महाले व मुरबाड रोड शाखा दोनच्या कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली.