ठाणे-शहापूरमधल्या प्लास्टिक कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

आग लागलेल्या या कंपनीचं नाव कृष्णा प्रमोशन असं आहे. कृष्णा प्रमोशन ही मुंबईतील सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीत ४०० ते ५०० कामगार काम करतात. जेव्हा कंपनीला आग लागली, तेव्हा कामगारांमध्ये एकच खळबळ माजली. परंतु यामध्ये सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाहीये.

    ठाणे : ठाणे-शहापूरमधल्या प्लास्टिक कंपनीला आज (मंगळवार) सकाळी भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. शहापूरमधल्या वेहळोली गावात ही कंपनी आहे. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच, अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच त्यांच्याकडून आग विझवण्यासाठी शर्थिचे प्रयत्न सुरू आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, आग लागलेल्या या कंपनीचं नाव कृष्णा प्रमोशन असं आहे. कृष्णा प्रमोशन ही मुंबईतील सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीत ४०० ते ५०० कामगार काम करतात. जेव्हा कंपनीला आग लागली, तेव्हा कामगारांमध्ये एकच खळबळ माजली. परंतु यामध्ये सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाहीये.

    आगीची तीव्रता अधिक प्रमाणात असल्यामुळे आग विझवण्याचे शर्थिचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून केलं जात आहेत. आगीचे लोट मोठे असल्यामुळे येथील परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्यापही अस्पष्ट आहे.