arrest

कल्याण : विवाहित असताना काही दिवसांपूर्वी पत्नीला घटस्फोट देत प्रेयसी लग्नास नकार देते म्हणून भर रस्त्यात मारहाण करणाऱ्या प्रियकारास महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्याची घटना कल्याणात घडली आहे.

कल्याण : विवाहित असताना काही दिवसांपूर्वी पत्नीला घटस्फोट देत प्रेयसी लग्नास नकार देते म्हणून भर रस्त्यात मारहाण करणाऱ्या प्रियकारास महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्याची घटना कल्याणात(kalyan crime) घडली आहे.

कल्याण पुर्वैत कचोरे परिसरात राहणारी तरूणी सर्वोदय मॉलमध्ये इन्शुरन्स कार्यालयात काम करते. तिचे काम आटपून ती मॉलच्या खाली शुक्रवारी संध्याकाळी उभी असता अजित कनोजिया या तरुणाने तुझ्यासाठी बायकोला सोडले आहे. तू आत्ता लग्नाला का नकार देतेस असे बोलून प्रेयसी तरूणीला भर रस्त्यात हुज्जत घालत बेदम मारहाण केली. काही नागरीकांनी अजितला पकडले. मात्र तो पळून गेला.

अजित कनोजियाचे काही वर्षापासून एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. अजित हा विवाहित आहे. विवाहित असताना या तरुणीसोबत प्रेमसंबंध सुरु होते. काही दिवसांपूर्वी आपल्या या प्रेयसीसाठी अजितने आपल्या पत्नीला सोडले होते. पत्नीला सोडल्यानंतर या तरुणीला तो वारंवार लग्नासाठी गळ घालत होता. तरुणीने त्याला लग्नासाठी नकार दिला. कालपण तो आला. त्याने तिला सांगितले की, तुझ्यासाठी बायकोला सोडले आहे. तू आत्ता लग्नाला का नकार देत आहेस असे विचारले. त्यावरुन त्यांच्या वाद झाला. या वादातून त्याने तिला मारहाण केली. या प्रकरणी तरुणीने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने वरिष्ठ पोलीस निरिक्षक नारायण बनकर यांनी या प्रकरणाचा तपास ए पी आय् दीपक सरोदे यांना दिला. त्यांंच्या पथकाने तात्काळ आरोपीला अटक केली आहे.