आजारी आईला भेटण्यासाठी ‘त्याचा’ नवी मुंबई तेे दिल्ली सायकल प्रवास, कुडुसच्या तरूणांनी दिला मदतीचा हात

संतोष पाटील, वाडा : आई आजारी असल्याने दिल्ली गाठायची आहे. मात्र राज्याच्या सीमा बंद आहेत आणि रोजगारही ठप्प झाला अशातच पैसे नाहीत आणि अत्यावश्यक सेवा वाहतूक वगळता इतर वाहतूक बंद झालेली. अशा

 संतोष पाटील, वाडा : आई आजारी असल्याने दिल्ली गाठायची आहे. मात्र राज्याच्या सीमा बंद आहेत आणि रोजगारही ठप्प झाला अशातच पैसे नाहीत आणि अत्यावश्यक सेवा वाहतूक वगळता इतर वाहतूक बंद झालेली. अशा परिस्थितीत करावे काय या विवंचनेत असलेल्या नवी मुंबईतील आकाश नावाच्या तरुणाने गाव गाठण्याच्या इर्शेने चक्क सायकलने प्रवास सुरु केला. सायकलने प्रवास सुरु असताना ठाणे जिल्ह्यातील भिवंडीजवळ त्याच्या सायकलचा टायर फुटला तरी  न डगमगता त्याने फुटलेल्या टायरवरच चालतच भिवंडी -वाडा या मार्गावरील ४० ते ५० किमी अंतर कापले. एखादे दुकान मिळेल तर टायर बदलून घेईन अशी मनात खुण गाठ बांधत त्याने पालघर जिल्ह्यातील कुडुस गाव गाठले. तिशे त्याला माणुसकीचा झरा वाहत असल्याचा प्रत्यय आला.

आकाश जात असताना कुडुस येथील स्वप्निल जाधव ,रुकसाद शेख हे मित्र दोघे उभे होते. यात स्वप्निल याने हा तरुण दोन बॅग सायकलवर लादून कुठे चाललाय याचे उत्तर शोधण्यासाठी त्या बोलावून घेतले. आकाशने मी नवी मुंबईतील कोपर खैरणेचा राहणारा आहे. माझी आई आजारी आहे.मला दिल्लीला जायचे आहे. पैसे नाहीत, हे सांगितले.  हे  ऐकताच  स्वप्निल जाधव आणि त्याचा मित्र रुकसाद यांनी त्या सायकलस्वाराची आणखी  विचारपूस  केली. तसेच त्याच्या फुटलेल्या टायर जागी नवीन टायर टयूब बसुन दिली आणि काही आर्थिक मदत देऊन आल्या पावली मागे जाण्यास  सांगितले. पण आई आजारी आहे म्हणून तो आता दिल्लीच्या दिशेने वाटचाल करित आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी माणुसकीचा आणि मदतीचा झरा वाहताना दिसतोय.  त्या अनोळखी आकाशला मदत करून
 त्याचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न कुडुसच्या या दोन मित्रांनी केल्याने माणुसकीचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे.