fraud

ठाणे : दोन हजार रुपयांच्या चलनी नोटांच्या बदल्यामध्ये जादा कमिशन देण्याच्या आमिषाने दहा ते पाचशे रुपयांचे सुटे पैसे देण्याच्या नावाखाली फसवणूक(fraud) करणाऱ्या भामट्याला कापूरबावडी(kapurbawdi) पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संजय मोहोड असे अटक(arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

या घटनेतील तक्रारदार कमरुद्दीन काझी यांची ठाण्यातील बाळकूम नाका, माजीवडा येथे मोहन आणि शर्मा असे नाव सांगणाऱ्या दुकलीने भारतीय चलनातील दहा, वीस, पन्नास, शंभर, दोनशे आणि पाचशे रुपये नोटांच्या बदल्यामध्ये दोन हजारांच्या नोटा बदलून घेऊन त्या बदल्यात जादा कमिशन देण्याचे अमिष दाखविले होते. त्यासाठी सात लाखांचा व्यवहार केला. मात्र, हा व्यवहार खोटा ठरवून पैशांची देवाण- घेवाण करतांना पोलिसांनी पकडल्याचा बनाव रचून शर्मा आणि त्याच्या इतर पाच साथीदारांनी मिळून सात लाखांची रोकड असलेली बॅग आणि मोबाइल घेऊन पोबारा केला होता.

हा प्रकार ४ मार्चला सायंकाळी घडला. याप्रकरणी काझी यांनी सात लाखांच्या फसवणूकीची तक्रार कापूरबावडी पोलीस ठाण्यात केली होती. आपली ओळख लपवून खोटया नावांचा तसेच दुसऱ्याच्या नावावरील सीम कार्डचा आरोपी वापर करीत होते. दरम्यान, तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस पथकाने २३ ऑक्टोबर रोजी नवी मुंबईतील कोपरखैरणे रेल्वे स्थानकासमोरील पुलाखाली मोहोड याला सिनेस्टाईल ताब्यात घेतले.