पहाटेच्या अंधाराचा फायदा घेत मूकबधीर तरुणीवर नराधमाने केला अत्याचार अन् झाला फरार,पोलिसांनी असा लावला छडा

पहाटेच्या सुमारास कल्याणातील(Kalyan) २३ वर्षीय मूकबधीर तरुणी रेल्वे स्टेशनकडे पायवाटेने कामाकरिता जात होती. त्यावेळी अंधाराचा व एकांताचा फायदा घेत या तरुणीला आडोशाला नेत अतिप्रसंग(Rape) करून तिच्याकडचा मोबाईल हिसकावून अश्विन भाई सरतान भाई राठवा या आरोपीने पळ काढला होता.

    कल्याण : एका मूकबधीर तरुणीवर पाशवी अत्याचार (Rape)करून तिच्याकडील मोबाईल हिसकावून २ जुलै रोजी फरार झालेल्या नराधमास महात्मा फुले चौक पोलिसांनी अहमदाबाद(Ahmadabad) येथे मोठ्या शिताफीने अटक(Rapist Arrested In Ahmadabad) केली आहे.

    पहाटेच्या सुमारास कल्याणातील(Kalyan) २३ वर्षीय मूकबधीर तरुणी रेल्वे स्टेशनकडे पायवाटेने कामाकरिता जात होती. त्यावेळी अंधाराचा व एकांताचा फायदा घेत या तरुणीला आडोशाला नेत अतिप्रसंग(Rape) करून तिच्याकडचा मोबाईल हिसकावून अश्विन भाई सरतान भाई राठवा या आरोपीने पळ काढला होता.

    ही घटना आपल्या परिवारास सांगितल्याने महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. महात्मा फुले चौक पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या शोधात पाच पथके निर्माण करून शोध कार्य सुरू ठेवले होते.

    सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज कल्याण स्टेशन परिसरातील दुकानदार, रिक्षा चालक, वॉचमन यांना दाखवून पोलिसांनी आरोपीचे नाव निष्पन्न केले होते. तांत्रिक मुद्द्यांच्या तपासा वरून आरोपी अहमदाबाद येथे असल्याची खात्री पटल्याने गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे, ठिकेकर ,भालेराव, हासे यांनी आरोपीला अटक केली.