भिवंडीतील क्वारंटाईन सेंटरमधून पळून जाणारा इसम गंभीर जखमी

भिवंडी: मुंबईतील चेंबूर परिसरात राहणारा ४४ वर्षीय व्यक्तीला १८ एप्रिल रोजी या भिवंडीतील क्वारंटाईन केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र, रविवारी सायंकाळी डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे कोणाचे लक्ष

 भिवंडी: मुंबईतील चेंबूर परिसरातल्या ४४ वर्षीय व्यक्तीला १८ एप्रिल रोजी या भिवंडीतील क्वारंटाईन केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र, रविवारी सायंकाळी डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे कोणाचे लक्ष नसताना या व्यक्तीने इमारतीच्या खिडकीतून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो व्यक्ती या घटनेत गंभीर जखमी झाल्याने त्याचा पळण्याचा प्रयत्न सपशेलपणे अयशस्वी ठरला.दरम्यान त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असुन त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.पोलिसांनी याबाबत गंभीर दखल घेऊन संशयित रूग्णा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

भिवंडी तालुक्यातील राजनोली नाक्यावर असलेल्या टाटा आमंत्रा शेजारी असलेल्या एमएमआरडीएच्या वतीने बांधण्यात आलेल्या म्हाडा इमारतीत असलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये हा प्रकार घडला आहे. ठाणे जिल्ह्यात झपाट्याने कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने संशयितांना या इमारतीत क्वारंटाईन केंद्रात ठेवण्यात आले आहे. सुमारे १४४ जण या केंद्रात आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरी व ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना  क्वारंटाईन  करण्यात येऊन त्यांच्यावर येथे उपचार केले जातात. मुंबईतील चेंबूर परिसरात राहणाऱ्या ४४ वर्षीय व्यक्तीला १८ एप्रिलला या केंद्रात दाखल केले होते. मात्र काल सायंकाळी डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे  लक्ष नसताना हा व्यक्तीने इमारतीच्या खिडकीतून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तो व्यक्ती या घटनेत गंभीर जखमी झाला असून त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.या प्रकरणी पोलीस नाईक प्रशांत बाविस्कर यांनी कोनगाव पोलीस ठाण्यात कोव्हिड १९ उपाययोजना २०२० चे नियम ११ व साथीचे रोग अधिनियम १८९७ चे कलम २, ३, ४, व आपत्ती व्यवस्थापक अधिनियम २००५ चे कलम ५२ (ब) सह भादवी. कलम ११८, २७१,३३८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अधिक तपास पोलीस निरीक्षक एस.काटकर करीत आहेत.