न्यायाधीशांच्या अंगावर त्याने भिरकावल्या चपला, मग मिळाली ‘ही’ शिक्षा

न्यायालयात न्यायमूर्तीनी शिक्षेची सुनावणी करताच संतप्त झालेल्या एका आरोपीने पायातील दोन्ही चपला काढून न्यायाधीशांच्या अंगावर भिरकावल्या. या प्रकरणी शुक्रवारी ठाणे जिल्हा सत्र न्यायाधीश पी. एम गुप्ता यांनी दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 

भिवंडी: न्यायालयात न्यायमूर्तीनी शिक्षेची सुनावणी करताच संतप्त झालेल्या एका आरोपीने पायातील दोन्ही चपला काढून न्यायाधीशांच्या अंगावर भिरकावल्या. या प्रकरणी शुक्रवारी ठाणे जिल्हा सत्र न्यायाधीश पी. एम गुप्ता यांनी दोन वर्षाच्या कारावासाची(two years imprisonment) शिक्षा सुनावली आहे.

अशरफ अन्सारी असे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी अशरफ अन्सारीवर याच्यावर विविध पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

२९ जानेवारी २०१९ रोजी भिवंडी शहर पोलिसांनी एका गुन्हयात सदर आरोपीस अटक करून भिवंडी न्यायालयात न्यायाधीशा समोर यांच्यासमोर हजर केले होते.त्या वेळी न्यायमुर्ती यांनी तुला गुन्हा कबूल असेल तर दंड आणि सहा महिन्यांची शिक्षा भोगावी लागेल असे आरोपी अशरफला सांगितलं. मात्र, मी आधीच १४ महिने शिक्षा भोगली असून ती कापून मला सोडून द्यावे, अशी विनंती आरोपीने केली होती. मात्र, आणखी सहा महिने शिक्षा भोगावीच लागेल, असे न्यायाधीशांनी सांगताच आरोपीला राग आला. या रागातूनच त्याने पायातील चपला काढून न्यायाधीशांच्या अंगावर भिरकावल्या. या घटनेमुळे न्यायालयाच्या आवारात एकच गोंधळ उडाला होता. या प्रकरणी त्यावेळी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली प्रसंगी न्यायालयाने आरोपीस दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.