father beating his son

कल्याण पुर्वेतील एका नराधम बापाने आपल्या सहा वर्षीय मुलाच्या पार्श्वभागावर, पायाच्या मांडीला गरम उलथ्याने चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

कल्याण : कल्याण(kalyan) पुर्वेतील एका नराधम बापाने आपल्या सहा वर्षीय मुलाच्या पार्श्वभागावर, पायाच्या मांडीला गरम उलथ्याने चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याण पुर्वेतील कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या आरोपी सचिन कांबळे या निष्ठूर बापाने आपल्या सहा वर्षीय निरागस, निष्पाप मुलाने जेवण करित असताना लघुशंका केल्याचा राग मनात धरून बाथरूममध्ये नेत गरम उल्हाथ्याने पायांच्या मांंडीच्या भागावर तसेच पार्श्वभागावर चटके दिले.(father tortured his son)

स्वतः च्या मुलास चटके देताना मुलांस बसणाऱ्या चटक्यांच्या डागामुळे होणाऱ्या वेदनामुळे मुलगा ओरडत असताना देखील या निष्ठूर बापाचे मन द्रावले नाही. यामुळे माणसातील ममत्व गेले कुठे असा हा पित्याच्या नात्याला काळिमा फासणारा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहुराव साळवे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संदर्भीत घटनेबाबत दुजोरा देत प्राथमिक माहिती देत निष्ठूर बाप आरोपी सचिन कांबळे विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. दरम्यान चिमुकल्या सहा वर्षीय मुलास नातेवाईकांनी रूक्मिणी बाई रूग्णालयात उपाचारासाठी दाखल केले.