कल्याण रेल्वे स्थानकात घडला भयानक प्रकार, प्रवाशाला तलवारीचा धाक दाखवत लुटण्याचा झाला प्रयत्न – पुढे काय घडले तुम्हीच वाचा

कल्याण रेल्वे स्थानकात (kalyan Railway Station)रात्री ११ वाजता लोकलची वाट पाहत फलाटावर उभ्या असलेल्या प्रवाशाला थेट तलवारीचा धाक दाखवत(Theft At Kalyan Station) लुटण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

    कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकात(kalyan Railway Station) गर्दुल्ले आणि पाकीटमारांचा वाढता वावर असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असतानाच आता रात्री ११ वाजता लोकलची वाट पाहत फलाटावर उभ्या असलेल्या प्रवाशाला थेट तलवारीचा धाक दाखवत(Theft At Kalyan Station) लुटण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

    आंबिवलीमध्ये राहणारे प्रीतम पाटील हा ३१ वर्षीय तरुण कल्याणात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असून रविवारी २९ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घरी जाण्यासाठी तो २ नंबर फलाटावर पुलाच्या खाली लोकलची वाट पाहत उभा होता. इतक्यात पुलावरून त्यांच्याजवळ आलेल्या गणेश वैरागर या २१ वर्षीय तरुणाने आपल्या शर्टाच्या आत लपवून ठेवलेली तलवार काढत या तलवारीचा धाक दाखवत जवळ असलेले पैसे आणि मोबाईल दे नाहीतर ठार मारेन, अशी धमकी दिली.मात्र त्याच्या सुदैवाने लोकलच्या प्रतीक्षेत असलेला आणखी एक प्रवासी तलवार बघून पुढे येत दोघांनी मिळून त्याला पकडून त्याच्याकडून तलवार काढून घेत आरडाओरड केला. यामुळे ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी निखील याला पकडून पोलीस ठाण्यात नेले.

    रेल्वे स्थानकात तलवारीसारखे धारदार हत्यार घेऊन वावरणाऱ्या आणि प्रवाशांना धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी निखीलवर गुन्हा दाखल करत त्याला पोलिसांनी अटक केली असून न्यायलयाने त्याला १ सप्टेबर पर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दारु पिण्याची सवय असलेल्या निखील याने दारूसाठी पैसे हवे असल्याने हा प्रकार केल्याची कबुली दिली असल्याचे तपास अधिकारी सांगळे यांनी सांगितले.