man saved in flood

टिटवाळ्यातील मांडा पश्चिमेत राहणारा युवक प्रशांत वाघमारे हा पोहण्यासाठी रिजेन्सी परिसरात गेला. तो पुराच्या पाण्यात पोहण्यासाठी गुरुवारी सकाळी ११वा. सुमारास उतरला असता पुराच्या पाण्यात वाहत तो तब्बल अडीच तासानंतर अटाळी काळू नदीपत्रात(kalu River) अटाळी मानी परिसरातील स्थानिक कोळी बांधवांना आढळला.

    कल्याण : टिटवाळ्यातील(Titwala) रिजेन्सी परिसरात राहणाऱ्या युवकाने पुराच्या पाण्यात(Flood Water) पोहायला उतरण्याचे(Swimming In Flood Water) केलेले धाडस त्याच्या अंगलटी आले होते. माज्ञ तब्बल अड्डीच तासानंतर पुराच्या पाण्यात वाहत असलेल्या युवकास अटाळीतील(Atali) कोळी बांधवांनी आपल्या होडीच्या मदतीने वाचविल्याने त्यास जीवनदान मिळाले आहे.

    टिटवाळ्यातील मांडा पश्चिमेत राहणारा युवक प्रशांत वाघमारे हा पोहण्यासाठी रिजेन्सी परिसरात गेला. तो पुराच्या पाण्यात पोहण्यासाठी गुरुवारी सकाळी ११वा. सुमारास उतरला असता पुराच्या पाण्यात वाहत तो तब्बल अडीच तासानंतर अटाळी काळू नदीपत्रात अटाळी मानी परिसरातील स्थानिक कोळी बांधवांना आढळला. विवेक कोनकर, शैलेश पाटील यांनी त्याला आपल्या होडीच्या मदतीने पुराच्या पाण्यातून बाहेर काढत जीवनदान दिले.

    प्रशांतचा जीव वाचविणाऱ्या विवेक कोनकर यांचे घर पुराच्या पाण्यात बुडाले असताना देखील अशा परिस्थितीत दुसऱ्याचा जीव वाचविला व कोळीबांधव हा दर्याचा राजा असल्याचे सिद्ध केले. भाजपा कार्यकर्ते शशिकांत पाटील, सचिन पाटील, लक्ष्मण ठाकूर यांनी पुराच्या पाण्यातुन बाहेर काढलेल्या भितीने घाबरलेल्या प्रशांतला चहापाणी दिलासा देत पोलीसांकडे सर्पुद केले.